भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बासरा लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी, गीताने आपल्या जवळच्या मैत्रीणींसोबत बॅचलर पार्टी सेलिब्रेट केली.
हरभजन सिंग आणि गीता बासराचा विवाह २९ ऑक्टोबरला पार पडणार आहे. गीता खूपच उत्साहात असून आपल्या मैत्रीणींसोबत बॅचलर पार्टी केल्यानंतर तिने सेल्फी स्टीकने फोटो काढून चाहत्यांशी आपला आनंद शेअर केला. दरम्यान, भज्जीने जालंधर गाठले असून लग्नाच्या तयारीच्या कामात तो गुंतला आहे.

Story img Loader