माजी अभिनेत्री गीता बसरा आणि पती हरभजन सिंग यांनी १० जुलै रोजी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे या जगात स्वागत केले. मात्र, गीता आणि हरभजन यांनी अजुनही त्यांच्या मुलाचे नाव काय आहे हे त्यांच्या चाहत्यांना सांगितले नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने मुलाच्या जन्मावर तिच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती ते सांगितले आहे.

गीताने नुकतीच एक मुलाखत दिली. डिलिव्हरीच्या वेळी हरभजन सिंग काय करत होता, याचा किस्सा गीताने या मुलाखतीत सांगितला आहे. ‘हरभजन तिच्या सोबत डिलिव्हरी रूममध्ये होता आणि तो सतत फोटो काढत होता. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला आनंद झाला आणि तो नाचू लागला’, असे गीताने एका वृत्तवाहिनीला सांगितले.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

पुढे ती म्हणाली, “जेव्हा डिलीव्हरी होणार असे सांगण्यात आले, तेव्हा त्याने फोटो काढायला सुरुवात केली. त्याला मुलं खूप आवडतात. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरच्या मुलांसोबत तो अजुनही खेळतो. बाळाला पाहिल्यानंतर तर त्याचा आनंद हा शिगेला पोहोचला. मी आणि हरभज आम्ही दोघं आमच्या मुलाला वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. कधी छोटू तर कधी शेरा.”

 

Story img Loader