डान्स रिअॅलिटी शोमधली परिक्षक गीता कपूर गीता मा म्हणून ओळखली जाते. गीता माने अजुन लग्न केले नाही. पण गीता माच्या खऱ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. गीता मा उर्फ ​​गीता कपूरच्या या मिस्ट्री बॉयबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?

गीता मा हे नाव बॉलिवूडमधील कोणत्या ही व्यक्तीसाठी नवीन नाही. गीता माने तिच्या डान्सिंग स्किल्सने सगळ्यांच्या मनात जागा केली आहे. गीता मा अनेक रिअॅलिटी शोच्या परिक्षकाचे काम करते. पण तिच्या लव्ह लाइफ विषयी कोणाला माहित नाही. गीता मा सध्या ४० वर्षांची झाली आहे. यातच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात असे म्हटले जाते की तो व्यक्ती गीता माचा बॉयफ्रेंड आहे.

आणखी वाचा : Video : सारा तेंडुलकरच्या ‘ब्राउन मुंडे’ गाण्यावरच्या दिल खेचक अदा

आणखी वाचा : मालिकेत एकमेकींशी भांडणाऱ्या संजना आणि अरुंधति खऱ्या आयुष्यात मात्र…

गीता मा ज्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्याचे नाव राजीव खींची असल्याते म्हटले जाते. राजीव खींची हा असिस्टंट डायरेक्टर असून काही चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. या आधी गीता मा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नसेल असे त्यांच्या चाहत्यांना वाटतं होते. त्यामुळे हे व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

Story img Loader