राज कुंद्राच्या जुहू इथल्या घरावर आणि काही ऑफिसमध्ये पोलिसांनी छापा टाकल्यानंतर पोर्नोग्राफी प्रकरणात तीन जणांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलंय. राज कुंद्राविरोधात क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने अभिनेत्री गहना वशिष्ठ सह तीन जणांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण गहना सध्या मुंबईत नसल्याने ती चौकशीसाठी हजर राहू शकली नाही. अशातच अभिनेत्री गहना वशिष्ठने एक मोठं वक्तव्य केलंय. तिच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका माध्यमाशी बोलताना तिने हे मोठं वक्तव्य केलंय. राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात सामील असलेल्या सर्व अभिनेत्री आणि इतर जणांची नाव पोलिसांना सांगण्यासाठी ती तयार आहे. त्यामूळे पोर्नोग्राफी प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळालं आहे. अश्लिल फिल्म रॅकेटमध्ये गहना वशिष्ठचं नाव समोर आल्यानंतर सुरूवातीला तिने राज कुंद्राच्या बाबतीत नवे खुलासे केले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील फिल्म रॅकेट प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठला 7 फेब्रुवारीला अटक झाली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात राज कुंद्राला अटक करण्यात आली. राज कुंद्राने पोर्न फिल्मच्या शूटसाठी कुणावर दबाव टाकला नव्हता, असं म्हणत गहनाने राज कुंद्राचा बचाव केला होता. इतकंच नव्हे तर पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा या दोघी ही खोटं बोलत असल्याचं तिने सांगितलं होतं.

या मुलाखतीत बोलातान अभिनेत्री गहना वशिष्ठ म्हणाली, “मला रात्री उशिरा चौकशीसाठीचा मेसेज मिळालाय, मला कोणत्याही प्रकारचं समन्स मिळालेलं नाही…मी सध्या मुंबईत नाही. त्यामूळे कोव्हिड प्रोटोकॉल आणि आरटीपीसीआर टेस्ट या सगळ्या नियमांमुळे मला चौकशीसाठी पोहोचता आलं नाही. माझे बॅंक खाते फ्रिज केलेली आहेत. त्यामूळे या दिवसांत मुंबईत जाण्यासाठी मला काही व्यवस्थाही करावी लागणार आहे. मी मुंबईत क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची मी उत्तर देण्यासाठी तयार आहे.”

आणखी वाचा : Raj Kundra Troll: कोर्टात हजेरी लावण्याआधी राज कुंद्राने केला असा इशारा; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

 

यापुढे बोलताना अभिनेत्री गहना वशिष्ठ म्हणाली, “मी यापूर्वीच पोलिसांना आवश्यक ती सर्व माहिती दिलेली आहे. यापूर्वी जेव्हा मला अटक झालेली त्यावेळीच मी ती सर्व माहिती दिली होती. पण आता ज्यावेळी मी क्राईम ब्रांचच्या पोलिसांना भेटेल त्यावेळी मी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व अभिनेत्री आणि इतर जणांची नाव देणार आहे. या प्रकरणात पुरूष आणि महिलांचा सुद्धा समावेश आहे. त्यांची नावं मी आधीच पोलिसांना दिलेली आहेत. आज ज्या अभिनेत्री पिडीत असल्याचा देखावा करत आहेत, त्या आपलं नाव आरोपी म्हणून समोर येईल म्हणून घाबरल्या आहेत आणि आपलं नाव येऊ नये म्हणून प्रत्येक जण एकमेकांवर आरोप करत आहेत. हे सगळेच जण पोर्न फिल्म बनवतात.”

आणखी वाचा : Kundra Case: शिल्पाने काही महिन्यांपूर्वी तो निर्णय का घेतला?, तपास सुरु

यापूढे आणखी खुलासा करताना अभिनेत्री गहना वशिष्ठ म्हणाली, “हे सगळे व्हिडीओ इंटरनेटवर सहज मिळतील…या सगळ्यांच्या विरोधात आता खरी माहिती पोलिसांना देणार आहे. केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करून काय मिळणार? राज कुंद्रा आणि या सगळ्या जणांनी मला फसवलंय आणि त्यांची वेळ आलीय.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gehana vasisth i will give the police names of all girls and people involved in the porn prp