वेगवेगळ्या कारणांमुळे अभिनेत्री गहना वशिष्ठ नेहमीच चर्चेत असते. गहनाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कंगना रणौतचा शो ‘लॉक अप’ वर वक्तव्य केलं आहे. याशिवाय निर्माती एकता कपूरवर गंभीर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गहनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गहना म्हणाली, “मला डिसेंबरमध्ये बालाजी कास्टिंग डिपार्टमेंटचा कॉल आला आणि त्यांनी मला शोबद्दल माहिती दिली. त्यांनी मला या शोचा भाग होण्यास सांगितले. ज्यावर उत्तर देत मी नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहे आणि यामुळे मला आता असा शो करायचा नाही, असे सांगून मी त्यांना नकार दिला. पण त्यांनी मला समजावले आणि नंतर भेटायला सांगितले”, असे गहना म्हणाली.

आणखी वाचा : १० दिवसांनंतर कर्माचा दाता शनिदेव बदलणार राशी, ‘या’ ४ राशीना होणार फायदा!

आणखी वाचा : सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरच्या ‘Pet Puran’ ट्रेलर प्रदर्शित, पाहिलात का?

पुढे गहना म्हणाली, “तिथे माझी भेट राकेश तिवारी नावाच्या व्यक्तिशी झाली. यावेळी त्याने मला शोबद्दल सांगितले. मग तो माझ्याशी पैशांबद्दल बोलत होता. त्यावेळी मला पैशांची खूप गरज आहे असे मी सांगितले. त्यावर राकेश म्हणाला की, आम्ही तुला जास्त पैसे देऊ शकणार नाही. दोन दिवसांनी मला पुन्हा फोन आला आणि माझ्याशी पैशांबद्दल बोलणं झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कन्फर्मेशन कॉल आला.”

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

पुढे गहना म्हणाली, “काही दिवसांनी मला फोन आला की पहिल्या आठवड्यात ते मला शोमध्ये घेऊ शकणार नाही, पुढच्या एपिसोडमध्ये घेऊ. माझ्यासाठी हे खूप विचित्र होतं कारण मी त्यानुसार सगळी तयारी केली होती. याच दरम्यान, लोकांना कळले की मी एका मोठ्या शोमधून पुन्हा एण्ट्री करणार आहे. त्यामुळे मला अनेक ऑफर्स आल्या, पण त्यांनी मला कोणताही शोचा भाग होऊ दिले नाही. मी याविषयी कोणाला सांगितलं नाही. काही दिवसांनंतर मी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि माझी दुसऱ्या आठवड्यात शोमध्ये एण्ट्री होणार का? असे विचारले आणि ते हो म्हणाले. “

आणखी वाचा : इब्राहिम अली खानसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर, पलक तिवारीने पहिल्यांदाच केले वक्तव्य म्हणाली…

पुढे या विषयी सविस्तर सांगताना गहना म्हणाली, “त्यानंतर पहिला आठवडा गेला आणि मी परत विचारले, तर ते म्हणाले की तुमची लवकरच एण्ट्री होणार. मग दुसरा, तिसरा आणि चौथा आठवडा उलटला पण काही अपडेट मिळाली नाही. मला काही कळत नव्हते. मग मी एक ग्रुप तयार केला आणि त्यात कास्टिंग, क्रिएटिव्ह सगळे होते, पण तिथेही टाळाटाळ करण्यात आली. मग यावर मी त्यांना म्हणाले की तो पर्यंत मी दुसरं काही करते तर त्यांनी नकार दिला. १८ मार्च रोजी मी त्या ग्रुपमधून लिव्ह झाले, त्यानंतर २१ मार्चला मला पुन्हा फोन आला की आम्ही तुमच्या सोबत असलेला करार संपवत आहोत. तुला पुढे शोमध्ये घेतले जाणार नाही. यावर कारण विचारता त्यांनी उत्तरही दिले नाही. आज ४ महिने झाले, माझ्याकडे काम नाही. “

आणखी वाचा : “मला गुटखा कंपनीच्या ऑफर येतात पण…”, पान मसालाच्या जाहिरातीनंतर अक्षय कुमारचा ‘हा’ जुना व्हिडीओ झाला व्हायरल

शेवटी गहना म्हणाली, “मला आता आयुष्यात एकता कपूरसोबत काम करायचे नाही. कुठेतरी काम नाही, हे देखील लोकांच्या आत्महत्या करण्याचे कारण आहे. त्यांना असेच लोक मुर्ख बनवतात. आत्महत्येचे विचारही मनात येतात, पण मी स्वतःला सावरते.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gehana vasisth puts allegation on ekta kapoor on approaching for lock upp dcp