बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोनचा काल ‘गहराइयां’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाता आपल्याला रिलेशनशिप ड्रामा पाहायला मिळणार आहे. या टीझरमधला एक सीन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तो म्हणजे दीपिका आणि अभिनेता सिद्धांतमधला किसींग सीन.
हा टीझर दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. टीझरच्या सुरुवातीला दीपिका आणि सिद्धार्थ किस करताना दिसले आहेत. त्यानंतर ते विभक्त झाले असून त्यांच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती येते. तरी देखील त्यांना एकमेकांची आठवण येत असते असे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाची मुळ कथा ही मित्रता आणि प्रेमाच्या अवतीभोवती फिरणारी असणार आहे.
आणखी वाचा : दीपिकाला रणबीरला द्यायचे होते कंडोमचं पॅकेट, यावर अभिनेत्याने दिले होते असे उत्तर
आणखी वाचा : भुवन बामने लावली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात हजेरी!
या चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बत्राने केले आहे. तर या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांथ व्यतिरिक्त अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. आता हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशात ही अॅमेझॉन प्राइमच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे.