बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसूजा ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया जरी सिनेसृष्टिपासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ती पती रितेश देशमुख सोबत वेगवगेळे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तसंच चाहतेही तिच्या पोस्टची आतुरतेने वाट बघत असतात. नुकतंच जिनिलियाने तिच्या फ्रेंड्ससोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिनिलियाने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे . यात ती आणि रितेश सोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शबीर अहलुवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल सोबत पाण्यात मसती करताना दिसत आहेत. यावेळस ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्यावर ते नाचत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘टीप टीप बरसा पानी’ असे कॅप्शनही तिने दिले आहे. हा व्हिडीओ तिच्या अकाऊंटवर शेअर होताच व्हायरल झाला आहे.  हजारोहुन अधिक लाइक्स या व्हिडीओला मिळले आहेत. तसंच चाहते कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर रितेश देशमुख लवकरच ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर जिनिलियाने  लग्नानंतर सिनेसृष्टिपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. ती तिचा वेळ फॅमिली सोबत  व्यतीत करत आहे. जिनिलियाआणि रितेशला दोन मुलं आहेत. ती त्यांच्या सोबतचे अनेक फोटो शेअर करत असते.