बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुखची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतीच जिनिलिया देशमुखने सोशल मीडियावर तिचे सासरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तिची दोन्ही मुलं यांच्याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
जिनिलिया देशमुख ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतीच जिनिलियाने तिची दोन्हीही मुलं रियान आणि राहिल यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे एका टेबलावर बसले आहे. त्यांच्या दोघांमध्ये विलासराव देशमुख यांचा फोटो पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोत तिची मुलं त्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
जिनिलियाने शेअर केला विलासराव देशमुखांसोबतचा आवडता फोटो, कॅप्शन चर्चेत
जिनिलियाची इन्स्टाग्राम पोस्ट
“प्रिय पप्पा,
रियान आणि राहिलने आज मला विचारलं, “आई, आम्ही आजोबांना एखादा प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का??” त्यांच्या या प्रश्नावर कोणतीही शंका मनात न ठेवता मी त्यांना म्हणाली, जर तुम्ही त्यांचे ऐकले तर ते तुम्हाला नक्कीच उत्तर देतील.
मी इतकी वर्षे प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलण्याचा आणि प्रत्येक गोष्टींची उत्तरं मिळवण्यात घालवली आहेत. मला माहित आहे की तुम्ही आमच्या कठीण काळात आमच्यासोबत होतात आणि आनंदाच्या काळात आमच्यासोबत आनंदही व्यक्त केलात. मला माहित आहे की आमच्या प्रत्येक शंकांचे तुम्ही उत्तर दिले आणि मला चांगलंच माहितीय की, मी जे लिहित असते, ते तुम्ही वाचत असता.
मला अजूनही आठवते की तुम्ही आम्हाला वचन दिले होते की, जर आम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवले तर तुम्ही कायम आमच्यासाठी उपलब्ध असाल. पप्पा तुमची आम्हाला खूप आठवण येते”, असे जिनिलियाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रितेश देशमुखने ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यावर संतापली जिनिलिया, म्हणाली “तू आता…”
दरम्यान वेड या मराठी चित्रपटाद्वारे जिनिलिया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहे. त्यासोबतच जिनिलिया ही मिस्टर मम्मी, ट्रायल पिरीयड यासारख्या चित्रपटांद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.