बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुजा. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. तसेच त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता देखील जिनिलियाने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तिला पुरुष महत्त्वाचे असतात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. पण जिनिलियाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती रितेश आणि काही मित्र परिवारासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. जिनिलिया तिची मैत्रीण एकता पारेखसोबत मिळून रितेश आणि राजीव पारेखसोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एकता आणि जिनिलिया दोघी बसलेल्या असतात. मागे रितेश आणि राजीव उभे असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एकता जिनिलियाला प्रश्न विचारते की, ‘तुला काय वाटते, पुरुष महत्त्वाचे वाटतात का?’
आणखी वाचा : साराची सावत्र आई करीनासोबतची जवळीक पाहून अमृता सिंहला होतोय त्रास?

एकताच्या प्रश्नावर जिनिलियाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जिनिलिया चेहऱ्यावर विचित्र हावभाव करत उत्तर देते. म्हणते की, ‘कशासाठी?’ जिनिलियाचे उत्तर ऐकून रितेश आणि राजीव यांना धक्काच बसतो. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण यावर कमेंट करताना दिसत आहेत.