बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा २७ डिसेंबरला वाढदिवस होता. सलमानने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसूजाने सलमानसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या व्हिडीओमुळे जिनिलियाला ट्रोल केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमानसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘मोठ्या मनाच्या माणसाला खूप-खूप शुभेच्छा. जगातील सर्व सुख तुला मिळो. आमचे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आज भाईचा वाढदिवस’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. सलमान आणि जिनिलियाचा डान्स करतानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पण अनेकांनी जिनिलियाला या व्हिडीओमुळे ट्रोल केले आहे.
Video: आता कुणाला उडवणार आहेस?; पनवेलमध्ये रिक्षा चालवल्यामुळे सलमान खान झाला ट्रोल

एका यूजरने कमेंट करत ‘वहिनीसाहेब तुम्ही आमचे आराध्यदैवत कै. विलासराव देशमुख यांच्या सुनबाई आहात. तुम्हाला अशा देशद्रोही आणि समाजकंठक लोकांपासून दूर राहायला पाहिजे. तुम्ही अशा व्यक्तीसोबत नाचत आहात ज्याच्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येत अभिनेत्रीचं नाव बदनाम झालेले आहे. पण आज हा व्हिडीओ बघून खरच खूप वाईट वाटलं. विचार करा साहेब असते तर त्यांनी आज काय विचार केला असता. वाईट वाटत असेल तर क्षमस्व’ असे म्हटले आहे.

तर काही यूजरने हा व्हिडीओ पाहून जिनिलिया आणि सलमानचे कौतुक केले आहे. हा आता पर्यंतचा चांगला व्हिडीओ आहे असे म्हटले आहे.