बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख मागच्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. रितेश देशमुखशी लग्न केल्यातर जिनिलिया करिअरमधून ब्रेक घेत संसारात रमली. मात्र आता पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. लवकरच ती ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच तिने पती रितेश देशमुखसोबत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर आता तिनं आणखी एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

जिनिलिया डिसूझा लवकर ‘ट्रायल पिरियड’ या चित्रपटात दिसणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर असलेल्या जिनिलियानं पुन्हा एकदा दमदार एंट्री करण्याचं ठरवलं आहे. सध्या तिच्याकडे हा चौथा चित्रपट असून नुकतंच तिने याची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली. तिची ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल झाली आहे.

ISRO successfully launches communication satellite NVS 02
‘इस्रो’चे शतकी उड्डाण
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Country first semiconductor project to be completed by December print eco news
देशातील पहिला अर्धसंवाहक प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्णत्वाला
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
Avinash Narkar And Aishwarya Narkar why constantly do reel videos
अविनाश-ऐश्वर्या नारकरांचा सतत Reel व्हिडीओ करण्यामागे आहे ‘हा’ हेतू, अभिनेते म्हणाले, “ज्या वेळेला आम्हाला…”
Vasai, Municipal Corporation, CCTV , beautification,
वसई : पालिकेने सुभोभीकरणासाठी हटवले चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे

आणखी वाचा- ‘मस्जिद है या शिवाला…’ ज्ञानवापी मशीद वादानंतर मनोज मुंतशीर यांची कविता व्हायरल

जिनिलिया डिसूझानं तिच्या इनस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या कारमधून शूटिंग लोकेशनवर जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जिनिलियानं लिहिलं, ‘आणखी एक नव्या सुरुवातीच्या दिशेने…नवा चित्रपट ‘ट्रायल पिरियड’ या वर्षातला हा चौथा चित्रपट असणार आहे. मी खूप आनंदी आहे.’

आणखी वाचा- मुलगी मालतीबद्दल निक जोनसला काय वाटतं? चॅट शोमध्ये केला खुलासा

दरम्यान ‘ट्रायल पिरियड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आलेया सेन करत असून जिनिलिया डिसूझा व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता मानव कौल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Story img Loader