जाने तू या जाने ना, तेरे नाल लव्ह हो गया या चित्रपटांत काम केल्यानंतर जेनेलिया देशमुख ही चित्रपटसृष्टीतून गायबचं झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती सलमानच्या जय हो चित्रपटाने पुर्नपदार्पण करत आहे. पण, यात ती मुख्य भूमिका साकारणार नसून, केवळ पाहुणी कलाकार म्हणून चित्रपटात झळकणार आहे.
जय हो मध्ये ती छोटी पण महत्वाची भूमिका साकारणार असून, सलमानच्या बहिणीच्या रुपात ती यात दिसेल. चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यांमध्ये तिचे काम आहे. त्यानंतर तिचा मृत्यू होतो, असे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
सलमानसोबत चित्रपटत तबू, सना खान, अश्मित पटेल आणि सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader