लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘स्त्री २’सारखा विक्रमी कमाई करणारा चित्रपट, ऑस्करच्या वेशीपर्यंत जाऊन आलेला ‘लापता लेडीज’ चित्रपट, ‘शैतान’, ‘आर्टिकल ३७०’ यांसारख्या व्यावसायिक आणि वेगळ्या विषयांवरच्या अशा दोन्ही पद्धतीचे चित्रपट सादर करत यशस्वी ठरलेल्या जिओ स्टुडिओजने नव्या वर्षासाठीही अशाच रंजक चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. नव्या वर्षाची सुरुवातच जिओ स्टुडिओजच्या ‘संगीत मानापमान’ या संगीतमय मराठी चित्रपटाच्या निमित्ताने होणार आहे. सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाच्या निमित्ताने नुकतंच जिओ स्टुडिओजच्या नवीन प्रतीक चिन्हाचेही अनावरण करण्यात आले.
मनोरंजन क्षेत्रात २०१८ साली आपली मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जिओ स्टुडिओजने आत्तापर्यंत चित्रपट आणि वेबमालिकांच्या निर्मितीचा शतकी आकडा ओलांडला आहे. सरत्या वर्षात चित्रपटांची आर्थिक कमाई आणि प्रेक्षकपसंती दोन्ही बाबतींत अग्रेसर राहिलेल्या जिओ स्टुडिओजने नवीन वर्षासाठीही नव्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे.
हेही वाचा >>>Video : “अमोल म्हणजे आमचा जीव…”, एकीकडे अप्पी-अर्जुन लग्नबंधनात अडकणार अन् दुसरीकडे अमोलची साथ सुटणार? पाहा प्रोमो
‘संगीत मानापमान’ने होणारी नव्या वर्षाची सुरुवात याबद्दल बोलताना, ‘भारतीय संस्कृतीतील अभिजात, सुंदर गोष्टी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्याचा जिओ स्टुडिओजचा उद्देश आहे. ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट एकाअर्थी मराठी रंगभूमी आणि संगीत नाटकांच्या ऐतिहासिक परंपरेला दिलेली मानवंदना आहे. शंकर-एहसान-लॉयसारखे प्रतिभावंत संगीतकार आणि मराठीतील नामवंत कलाकार, गायक-गायिकांना बरोबर घेऊन केलेली ही कलाकृती संगीत कशा पद्धतीने वैश्विक स्तरावर सगळ्यांना आपलेसे करत एकत्र आणते याचे उत्तम उदाहरण आहे. इतकी उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला अभिमान वाटतो’ अशी भावना ‘आरआयएल’च्या माध्यम व्यवसाय विभागाच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
सरत्या वर्षात जिओ स्टुडिओजच्या चित्रपटांना मिळालेल्या विक्रमी यशाबद्दलही ज्योती देशपांडे यांनी आनंद व्यक्त केला. ‘२०२४ या वर्षात जिओ स्टुडिओजच्या लागोपाठ प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी प्रचंड यश मिळवले. हे यश साजरे करत जिओ स्टुडिओजने आपले नवे प्रतीकचिन्ह प्रदर्शित केले आहे.
भारतीय संस्कृती आणि परंपरांची सुवर्णझळाळी या प्रतीकचिन्हात प्रतिबिंबित होईल आणि जिओ स्टुडिओजच्या पुढच्या महत्त्वाकांक्षी वाटचालीचा उद्देशही त्यातून स्पष्ट होईल अशा पद्धतीने या नव्या प्रतीकचिन्हाची रचना करण्यात आली आहे. यापुढेही भारतीय कथांच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांना जोडून घेत जिओ स्टुडिओजची वाटचाल अशीच पुढे सुरू राहील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नव्या वर्षात २५ जानेवारीला ‘स्काय फोर्स’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अक्षय कुमार, निम्रत कौर, सारा अली खान आणि वीर पहारिया यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. याशिवाय, अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव या दोन नवोदित कलाकारांचे पदार्पण असलेला ‘नखरेवाली’, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन अशा कलाकारांना एकत्र आणणारा ‘धुरंधर’, नागराज मंजुळे यांचा ‘खाशाबा’ आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘किर्र काटा किर्र’ हे दोन मराठी चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे जिओ स्टुडिओजने जाहीर केले.