बॉलीवूडमधील पूर्वाश्रमीचे प्रियकर रणबीर-दीपिका हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. गोंधळलात ना, पण ही जोडी एका चित्रपटाकरिता पुन्हा एकत्र येत आहे.
गेल्याच वर्षी ‘ये जवानी है दिवानी‘मध्ये हीट ठरलेली रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची जोडी ‘तमाशा’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली करणार असून, याच्या चित्रीकरणाची सुरुवात जुलैपासून होण्याची शक्यता आहे.
इम्तिजायने रणबीरबरोबर ‘रॉकस्टार‘ तर दीपिकासोबत ‘लव्ह आजकल‘ सारखे सुपरहीट चित्रपट दिले आहेत. पण, दोघांना एकत्र घेऊन तो पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. ‘बचना ए हसीनो’ चित्रपटावेळी दीपिका आणि रणबीरची प्रेमकहानी सुरु झाली. मात्र, दोन वर्षातच त्यांचा ब्रेक-अप झाल्याची बातमी सर्वांना कळली. पण त्यानंतरही हे दोघेजण खूप चांगले मित्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी बहुतेक ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपट केला असावा आणि आता ‘तमाशा’मध्ये आपली केमिस्ट्री चाहत्यांना दाखविण्यासाठी ते पुन्हा सज्ज झाले आहेत.
‘विंडो सीट’ असे मूळ शिर्षक असलेल्या ‘तमाशा’ चित्रपटाची निर्मिती साजिद नादियवाला करत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा