‘जिगीषा’ आणि ‘अष्टविनायक’ या नाटय़संस्थांचं एकत्र येणं, नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या जोडीचं बऱ्याच कालावधीनंतर रंगभूमीवर आलेलं नवं नाटक आणि अभिनेते स्वप्नील जोशी यांचं रंगमंचावरील प्रथम पदार्पण अशा वैशिष्टय़ांसह रंगभूमीवर आलेल्या ‘गेट वेल सून..’ या नाटकाचा ७५ वा प्रयोग रविवार, ९ मार्च रोजी दुपारी शिवाजी मंदिर येथे सादर होत आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या एका वेगळ्याच संकल्पनेवर आधारीत हे नाटक आहे.
प्रदीप मुळ्ये यांचं अभिनव नेपथ्य, मिलिंद जोशी यांचं प्रभावी पाश्र्वसंगीत आणि प्रतिमा जोशी- भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा लाभलेल्या या नाटकात संदीप मेहता, समिधा गुरू, माधवी कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
महाराष्ट्र व गोव्यातील जाणकार समीक्षकांसह रसिकांचा उत्तम प्रतिसाद ‘गेट वेल सून..’ला लाभला आहे.
आणखी वाचा