कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयला समजले आहे. कुठेतरी अक्षयला कियारासाठी अमृताला सोडल्याचे दु:ख जाणवू लागले आहे. परंतु हे तो अमृताला सांगू शकत नाहीये. कियाराने आपल्याशी इतक मोठं खोटं बोलल्याचे अक्षयला सहन होत नाहीये. तो पूर्णपणे खचून गेला आहे. अक्षयच्या वागण्यात झालेला बदल, त्याची चिडचिड, त्याचा मनस्ताप सगळं अमृताला दिसत आहे पण ती त्याला मदत करू शकत नाही. कारण त्याच्या अश्या वागण्यामागचे कारण तिला अजून कळाले नाहीये. हे सगळे घडत असतानाच अमृता आणि अक्षयची मैत्रीण त्यांना त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावते. तेंव्हा अनाहूतपणे अक्षय आणि अमृता एकमेकांच्या जवळ येतात. माईंना हे कळाले आहे. अक्षय आणि अमृता तिथे एकत्र आहेत, आता यात माई कोणाला दोषी ठरवणार अमृता की अक्षय? अमृता या परिस्थितीला कसे सांभाळून घेईल? या घटनेने दोघांच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाची भावना येणार का? अक्षय आणि अमृता यांच्या नात्याचा बंध अजून दृढ होणार का? अक्षय अमृताला कियाराचे सत्य सांगणार का हे बघणे रंजक ठरणार आहे.

अक्षयला कियाराच्या वागण्याने खूप एकटेपण वाटत आहे आणि त्याला खात्री आहे की अमृताच त्याला मदत करू शकते. अक्षय अमृताला हे पटवून देतो की अमृताच ती एकमेव व्यक्ती आहे जी त्याला या सगळ्या गुंत्यातून बाहेर काढू शकते. तीच आहे जी या सगळ्या अडचणींमधून अक्षयला धीर देऊ शकते, मार्ग दाखवू शकते. अमृताला अक्षयचे हे वागणे पटत नसून ती अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करते की आता त्याची बायको कियारा आहे आणि हे सगळं घडत असतानाच अक्षय आणि अमृताला माई एकत्र बघतात. दुसरीकडे वसुधा घाडगे कुटुंबाला पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे तिचा काय हेतू आहे हे कुणालाच माहित नाही.
‘घाडगे & सून’ मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.

average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Palm oil shortage will lead to increase in edible oil prices
पामतेलाच्या तुटवड्यामुळे खाद्यतेलाची दरवाढ होणार?
demand diesel SUV cars
विश्लेषण : डिझेल एसयूव्ही कार्सच्या मागणीत वाढ का होत आहे?
Pune Pigeon grain, Pune Pigeon,
पुणे : पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वसूल केला इतक्या हजारांचा दंड !
Sanjeev Abhyankar, Sanjeevan Samadhi Sohala, Mahasadhu Shree Moraya Gosavi Maharaj Sanjivan Samadhi Mandir, pimpari,
पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन
Survey of wetlands in Maharashtra State National Centre for Sustainable Coastal Management Report thane news
५६४ पाणथळींचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती!
Story img Loader