कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयला समजले आहे. कुठेतरी अक्षयला कियारासाठी अमृताला सोडल्याचे दु:ख जाणवू लागले आहे. परंतु हे तो अमृताला सांगू शकत नाहीये. कियाराने आपल्याशी इतक मोठं खोटं बोलल्याचे अक्षयला सहन होत नाहीये. तो पूर्णपणे खचून गेला आहे. अक्षयच्या वागण्यात झालेला बदल, त्याची चिडचिड, त्याचा मनस्ताप सगळं अमृताला दिसत आहे पण ती त्याला मदत करू शकत नाही. कारण त्याच्या अश्या वागण्यामागचे कारण तिला अजून कळाले नाहीये. हे सगळे घडत असतानाच अमृता आणि अक्षयची मैत्रीण त्यांना त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावते. तेंव्हा अनाहूतपणे अक्षय आणि अमृता एकमेकांच्या जवळ येतात. माईंना हे कळाले आहे. अक्षय आणि अमृता तिथे एकत्र आहेत, आता यात माई कोणाला दोषी ठरवणार अमृता की अक्षय? अमृता या परिस्थितीला कसे सांभाळून घेईल? या घटनेने दोघांच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाची भावना येणार का? अक्षय आणि अमृता यांच्या नात्याचा बंध अजून दृढ होणार का? अक्षय अमृताला कियाराचे सत्य सांगणार का हे बघणे रंजक ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा