इमरान हाश्मी, विद्या बालन यांनी अभिनय केलेला आगामी चित्रपट ‘घनचक्कर’चे निर्माते यूटीव्ही कायदेशीर समस्यांमध्ये अडकले आहेत. ‘घनचक्कर’ चित्रपटाची पटकथा ही नेपाळमधील लेखक धिरेंद्र कुमार यांनी लिहिलेल्या पटकथेप्रमाणे असल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांवर करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जवळ आलेली असताना धिरेंद्र यांनी २०मे रोजी निर्मात्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. कुमार यांचे म्हणणे आहे, की त्यांनी २०१०-११ साली ही पटकथा लिहिली होती आणि त्याची नोंदणीही करण्यात आली होती.
कुमार यांनी केलेला दावा हा पूर्णपणे खोटा असल्याचे यूटीव्हीने सांगितले आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित घनचक्कर हा चित्रपट २८जूनला प्रदर्शित होणार आहे.
‘घनचक्कर’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस
इमरान हाश्मी, विद्या बालन यांनी अभिनय केलेला आगामी चित्रपट 'घनचक्कर'चे निर्माते यूटीव्ही कायदेशीर समस्यांमध्ये अडकले आहेत.

First published on: 22-06-2013 at 07:36 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsविद्या बालनVidya Balanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghanchakkar makers slapped with legal notice