‘बिग बॉस’ या चर्चित रिअॅलिटी शोचा १६ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. २ ऑक्टोबर रोजी हा शो ऑन एअर होणार असून नेहमीप्रमाणेच यंदाही अभिनेता सलमान खान या शोचा होस्ट असणार आहे. शो ऑन एअर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना निर्मात्यांनी याचा एक प्रोमो रिलीज करत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. बिग बॉसमध्ये टीव्हीवर दोन लोकप्रिय अभिनेत्री दिसणार असल्याचं वृत्त समोर आलंय.

हेही वाचा – गौरीला अजिबात आवडत नाही शाहरुखची ‘ही’ सवय; म्हणाली, “त्याच्या या सवयीमुळे पार्टी…”

टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपी बहुची भूमिका साकारणारी जिया माणेक आणि अभिनेत्री रिद्धीमा पंडित यांना यंदाच्या बिग बॉस सीझनसाठी निर्मात्यांनी ऑफर पाठवली आहे. रिद्धीमा पंडित बिग बॉस ओटीटीचा भाग राहिली आहे, पण ती शोमध्ये जास्त काळ टिकू शकली नसती. बिग बॉस ओटीटीपूर्वी रिद्धीमा ‘हमारी बहु रजनीकांत’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तर, जियाने लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया’ अर्ध्यातच सोडली होती. त्यानंतर तिच्या जागी देवोलीना भट्टचारजीने गोपी बहुची भूमिका साकारली होती. दरम्यान, या दोघींना निर्मात्यांनी ऑफर पाठवली आहे, परंतु त्यांनी ती स्वीकारली आहे की नाही आणि या दोघी बिग बॉसमध्ये दिसणार की नाही, हे अस्पष्ट आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याशी घटस्फोटानंतर लिव्ह-इनमध्ये राहतेय मराठमोळी रेशम टिपणीस; दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली…

रिद्धीमा आणि जिया दोघीही सध्या स्क्रीनवर दिसत नाहीयेत. साथ निभाना साथिया सोडल्यानंतर बराच काळ जिया माणेक पडद्यापासून दूर होती. नंतर ती ‘तेरा मेरा साथ रहे’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये येऊ शकली नाही, तसेच प्रेक्षकांनाही ती फार पसंतीस पडली नाही, त्यामुळे निर्मात्यांनी ती मालिका बंद केली होती. बराच काळ टीव्हीपासून दूर असलेल्या या दोन्ही अभिनेत्रींचे चाहते मात्र त्या बिग बॉसमध्ये दिसणार असल्याच्या बातम्यांनी आनंदी दिसत आहेत. परंतु दोघींनी याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही, तसेच निर्मात्यांनीही त्यांच्या नावाबद्दल स्पष्टता केलेली नाही.

Story img Loader