जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन झाले आहे. त्या ९५ वर्षांच्या होत्या. जीना लोलोब्रिगिडा यांनी ५० आणि ६० व्या शतकात युरोपियन सिनेसृष्टीत चांगलेच हिट चित्रपट दिले. त्यांना २० व्या शतकातील मोनालिसा या नावानेही ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकार त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये जीना लोलोब्रिगिडा यांच्या मांडीजवळील हाडाला दुखापत झाली होती. त्यांच्या मांडीचे हाड तुटले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर जीना लोलोब्रिगिडा या अगदी ठणठणीत झाल्या होत्या. त्या चालत-फिरतही होत्या. पण अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. जिना लोलोब्रिगिडा यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
आणखी वाचा : ‘केजीएफ’ फेम अभिनेत्याचे निधन, ‘रॉकी’बरोबर साकारलेली महत्त्वाची भूमिका

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना

जिना लोलोब्रिगिडा यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीमध्ये चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या कायमच प्रसिद्धीझोतात पाहायला मिळाल्या. त्या ५० ते ६० या दशकात युरोपियन चित्रपटातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. जिना यांनी त्यांच्या अभिनयाने जगभरात आपला ठसा उमटवला. जीना लोलोब्रिगिडाच्या पालकांचा फर्निचरचा व्यवसाय होता. पण कौटुंबिक व्यवसायात सहभागी होण्याऐवजी त्यांनी सिनेसृष्टीच्या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : “तर आयुष्यात…” अमराठी मुलाबरोबर लग्न केल्याच्या ट्रोलिंगवर ऋता दुर्गुळे स्पष्टच बोलली

त्यांनी अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता. जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून त्यांना ओळखले जायचे. जिना लोलोब्रिगिडा यांनी इटालियन चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून करिअरची सुरुवात केली. जीना लोलोब्रिगिडाचे टोपणनाव ‘लोलो’ होते. त्यांना सर्वजण याच नावाने हाक मारायचे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने जीना लोलोब्रिगिडा यांच्या नावावरुन प्रभावित होत स्वत:ला लोला असे टोपणनाव दिले.

Story img Loader