गिरीजा ओक (तारे जमीन पर), प्रिया बापट (मुन्नाभाई एमबीबीएस), सई ताम्हणकर (गजनी), ज्युनियर सोनाली कुलकर्णी (ग्रॅन्ड मस्ती) या मराठी तारका हिंदी चित्रपटातून लहान-मोठ्या भूमिकात चमकताना आपण पाहतोय. मराठीतील काही नायिका दक्षिणेकडच्या तमिळ-कन्नड वगैरे चित्रपटातून भूमिका साकारत आहेत. अशा वाटचालीपासून आपणदेखिल प्रेरणा घ्यावी असे अन्य मराठी तारकाना वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. गिरीजा जोशी हिलाही तसेच वाटतेय. ‘गोविंदा’ चित्रपटाच्या पूर्व-प्रसिध्दीत तिला फारसे स्थान मिळाले नसले तरी ‘धमक’च्या प्रसिध्दीत तिचा डंका वाजतो आहे. सध्या ती इतरही मराठी चित्रपटातून व्यवस्थित बिझी आहे.
मराठी चित्रपटाबरोबरच हिंदी आणि दक्षिणेच्या चित्रपटातूनही भूमिका मिळवायचा माझा खूप प्रयत्न सुरु आहे, पण नेमके कसे पाऊल टाकायचे हे लक्षात येत नाही. माझा एखादा मराठी चित्रपट यशस्वी ठरला आणि मी व्यवस्थित नावारुपाला आले तर मला काही मार्ग सापडेल असे वाटते, गिरीजा जोशी अगदी योग्य शब्दात आपल्या भावना व्यक्त करते. गिरीजा अगदी वस्तुस्थितीला धरून बोलते म्हणून हो आपण तिचे कौतुक करायचे. तूर्त आपण तिला शुभेच्छा देवू या. सध्या तिला त्याचीच गरज आहे आणि आपण तेच देवू शकतो.

Story img Loader