‘गो गोवा गॉन’ चित्रपटात अभिनेता सैफ अली खानने गोव्यातील धुम्रपान कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आणि चित्रपटात गोवा राज्याचा अपमान केल्याबद्दल या चित्रपटावर गोवा राज्यसराकारने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी प्रमोद सावंत यांनी या चित्रपटात झालेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे मुद्दे विधानसभेत मांडले. ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटात गोवा राज्याचा अपमान झाल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे. तसेच या चित्रपटाचे निर्माते ‘गोवा’ यानावाचा दुरुपयोग करत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाच्या पोस्टर्सवर अभिनेता सैफ अली खान सिगारेट ओढताना दाखवण्यात आले आहे. यावर ‘नॅशनल ऑर्गनायजेशन फॉर टोबॅको इरेडिकेशन’ या एनजीओने चित्रपटाचे निर्माते राज निदिमारु आणि कृष्णा डीके तसेच अभिनेता सैफ अली खानला नोटीस पाठविली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सावंत यांच्या या प्रश्नाची दखल घेत त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
‘गो गोवा गॉन’ चित्रपटावर गोवा राज्यसरकार कारवाई करणार
'गो गोवा गॉन' चित्रपटात अभिनेता सैफ अली खानने गोव्यातील धुम्रपान कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आणि चित्रपटात गोवा राज्याचा अपमान केल्याबद्दल या चित्रपटावर गोवा राज्यसराकारने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 10-04-2013 at 11:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa government going to take action on movie go goa gone