तेलुगू स्टार चिरंजीवी यांच्या बहुचर्चित ‘गॉडफादर’ चित्रपटाची मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच सलमान खानही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं ‘थार- मार’ हे चिरंजीवी आणि सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्याचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गॉडफादर’च्या धमाकेदार ट्रेलरमध्ये चिरंजीवी ब्रह्माच्या दमदार भूमिकेत दिसत आहेत. मात्र राजकारणात त्यांचे बरेच विरोधक असल्याचंही पाहायला मिळत आहे. चिरंजीवी त्यांच्या या विरोधकांशी पूर्ण ताकदीने लढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण खरी धम्माल तेव्हा येते जेव्हा या सगळ्यामध्ये सलमान खानची एंट्री होते. तो चिरंजीवी यांना त्यांच्या विरोधकांशी लढण्यासाठी मदत करतो. या ट्रेलरमध्ये चिरंजीवी त्याचे मोठे भाऊ असल्याचं सांगताना दिसते. सलमान आणि चिरंजीवी यांचे धमाकेदार अॅक्शन सीन्स असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

आणखी वाचा- दीपिका- रणवीरच्या वैवाहिक आयुष्यात वादळ? चर्चांवर अभिनेत्यानं सोडलं मौन

गॉडफादरमध्ये नयनतारा आणि सत्य देव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘गॉडफादर’ हा मल्याळम या ‘ल्यूसिफर’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहन राजा यांनी केलं आहे. रिपोर्ट्सनुसार चिरंजीवी यांच्या या चित्रपटासाठी सलमान खानने कोणतंही मानधन घेतलेलं नाही.

आणखी वाचा- ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान ?, चर्चांना उधाण

दरम्यान सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या तो ‘किसी का भाई किसी की जान’ आणि बिग बॉस १६ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय लवकरच तो अनीस बज्मी यांच्या ‘नो एंट्री में एंट्री’चं शूटिंग सुरू करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Godfather trailer release salman khan chiranjivi in lead role mrj