कुठल्याही क्षेत्रात एक पिढी जेव्हा मावळतीच्या टोकावर असते तेव्हा उगवत्या पिढीचा हात धरून त्यांना दिशा दाखवण्याची जबाबदारी ही त्या जाणत्या पिढीचीच असते. हिंदी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही.
गेल्या काही वर्षांत अर्जुन कपूर, सोनम कपूर, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अलिया भट्ट या नवीन कलाकारांच्या फळीने बॉलीवूडवर पकड घेतली असली तरी अजून त्यांच्यापेक्षाही नव्या कलाकारांची एक फौज बॉलीवूडच्या उंबरठय़ावर प्रवेशासाठी धडपडते आहे. मात्र, त्यांना पुढे आणण्यासाठी सलमान खान, फरहान अख्तर, अक्षयकुमार आणि अगदी आमिर खानसारख्या मोठमोठय़ा कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. नव्या कलाकारांना बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वात मोठा आधार मिळतो तो ‘भाई’चा. ‘बीइंग ह्य़ुमन’ सलमान खानमुळे याआधीच अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांना बॉलीवूडची वाट मिळाली आहे. अगदी दोघांनाही वजन कमी करायला लावून चित्रपटापर्यंत आणण्याचा खटाटोप सलमानने केला आणि तो फळालाही आला. पण सतत नव्या चेहऱ्यांना टिपून त्यांना बॉलीवूडमध्ये आणणे हा जणू त्याचा सहजस्वभावच झाला आहे. आणि केवळ त्याच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच अनेक कलाकार आपण बॉलीवूडमध्ये येण्याचे स्वप्न पाहू शकतो, असे सांगतात.
जुन्या पिढीतील कलाकारांनी नव्या कलाकारांना चित्रपटातून संधी देण्याचा खटाटोप का चालवला असेल? या प्रश्नावर फरहान अख्तरचे उत्तर चांगले आहे. फरहानच्या मते कुठल्याही क्षेत्रात प्रत्येक पिढीने नव्या पिढीला घडवलेच पाहिजे. तरच त्या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होऊ शकते. माझा पिढी घडवण्यावर विश्वास आहे, असे सांगणाऱ्या फरहानने आपल्या एक्सेल एंटरटेन्मेट या बॅनरखाली अनेक नव्या कलाकारांना संधी देऊ केली आहे. एवढेच नव्हे तर पुलकित सम्राट, मनजोत सिंग, अली फ जल, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा आणि विशाखा सिंग अशा अगदी नव्या कलाकारांना त्याने ‘फुकरे’ चित्रपटात संधी दिलीच. पण, तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्याबरोबर सतत काम करीत राहणार, असं आश्वासनही त्याने दिले आहे. अक्षयकुमारची निर्मिती असलेल्या ‘फुगले’ चित्रपटातूनही नव्या कलाकारांची फौज दाखल होते आहे यात मोहित मारवा, विजेंदर सिंग, कियरा अडवाणी यांचा समावेश आहे, तर सलमाननेही बिलाल अमरोही आणि पुलकितच्या ‘ओ तेरी’ चित्रपटामागे आपली सारी शक्ती उभी केली होती. आपल्या मित्रासाठी का होईना, आमिर खाननेही स्वत: जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर याच्या पदार्पणातील ‘हिरोपंती’ या चित्रपटासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याची माध्यमांना ओळख करून दिली. नव्यांना पुढे आणण्यासाठी कलाकारच नव्हे तर निर्माता-दिग्दर्शकांनीही पुढाकार घेतला असून राकेश ओमप्रकाश मेहरा हे अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनला ‘मिर्झा साहिब’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आणणार आहेत. या बिनीच्या शिलेदारांनी दिलेला पाठिंबा आणि मदत आज बॉलीवूडमध्ये फार उपयोगी पडते आहे, असा या नव्या कलाकारांचा दावा आहे.
* फरहानचा पाठिंबा आणि त्याने दिलेले आश्वासन खूप मोलाचे आहे -अली फजल
‘थ्री इडियट्स’मध्ये मी केलेली जोची भूमिका लोकांना लक्षात राहिली होती. त्यानंतर एक चित्रपटही मी केला,
* ‘स्टार’ कलाकारांमुळे बॉलीवूडची बिकट वाट सोपी होते -पुलकित सम्राट
* त्यांच्याचमुळे तर पटकथा लेखक ते अभिनेता एवढा पल्ला एका उडीतच गाठता आला -बिलाल अमरोही
* अक्षय असला तरी ऑडिशन्सपासून कामापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता -मोहित मारवा
‘फुगले’ या अक्षयकुमार आणि अश्विनी यार्दीच्या ग्रेझिंग गोट्स प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या चित्रपटातून बॉलीवूड प्रवेशासाठी सज्ज असलेला मोहित मारवा हा अर्जुन आणि सोनम कपूर यांचा चुलत
*चांगली निर्मिती संस्था पाठीशी असल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही -विजेंदर सिंग
ऑलिम्पिक विजेता विजेंदर सिंग यालाही अक्षयने ‘फुगले’मधून अभिनेता होण्याची संधी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा