प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासाठी २०२३ या वर्षाची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. सर्वात आधी वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचा ‘RRR’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांसाठी शॉर्टलिस्ट झाला. त्यानंतर आता याच चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

गोल्डन ग्लोब्समध्ये RRR चित्रपटाचं प्रतिनिधीत्व दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी केलं. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

आणखी वाचा- ‘नाटू नाटू’ गाण्याचा ऑस्करमध्ये डंका?

‘नाटू नाटू’चे म्युझिक कम्पोजर एम एम केरावनी यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर मंचावर जाऊन ट्रॉफी घेतली त्यानंतर त्यांनी पुरस्कारासह फोटोसाठी पोजही दिली. ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी देण्यात आलेला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग केरवानी यांनी आपल्या नावे केला. हे गाणं बेस्ट सॉन्ग (मोशन पिक्चर) च्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेट करण्यात आलं होतं.

आणखी वाचा- Viral : आरआरआरची जपानी यूट्यूबरलाही भुरळ, ‘नाटू नाटू’ गाण्यावर केले अफलातून नृत्य, पाहा व्हिडिओ

आणखी वाचा- केवळ ९८ सेकंदात ‘RRR’चा शो हाऊसफुल्ल; विक्रमी तिकीटविक्री करत बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई

दरम्यान जागतिक पातळीवर RRR ने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. याआधी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्डमध्ये राजामौली यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. RRR ऑस्करसाठीही सर्व कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झाला आहे. त्यामुळे आता कोणत्याही एका कॅटेगरीमध्ये हा चित्रपट नॉमिनेट व्हावा अशी अपेक्षा आहे.

Story img Loader