Good Bad Ugly Movie Box Office Collection Day 6: सध्या बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या ‘सिकंदर’ आणि सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाला दाक्षिणात्य ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपट चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमारचा हा चित्रपट अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. २०२५मधील सर्वाधिक कमाई करणारा ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपट ठरला आहे. सहा दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे.
अजित कुमारचा ‘विदामुयार्ची’ चित्रपटानंतर ‘गुड बॅड अग्ली’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, यामुळे ‘सिकंदर’, ‘जाट’ चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे. असं असलं तरी ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस घट होतानाही दिसत आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली? जाणून घ्या…
‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २९.२५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे १४ कोटी आणि १९.७५ कोटींचा गल्ला जमवला होता. तर चौथ्या दिवशी २२.२३ कोटी, पाचव्या दिवशी १५ कोटींची कमाई ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने केली होती. ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार अजित कुमारच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी ६.५० कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने १०७.८० कोटींची कमाई केली आहे.
अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’ हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अधिक रविचंद्रनने केलं आहे. या चित्रपटात गँगस्टर डॉनची कहाणी दाखवली आहे. या चित्रपटात अजित कुमार आणि तृष्णा कृष्णन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन जीवी प्रकाश कुमार यांनी केलं आहे. या चित्रपटात अजित कुमार, तृष्णा कृष्णन व्यतिरिक्त सुनील, अर्जुन दास, प्रिया प्रकाश वारियर, आणि प्रसन्ना महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. माहितीनुसार, २०० ते ३०० कोटींच्या बजेटमध्ये ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाचं बनवण्यात आला आहे.