बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुख यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच जिनिलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रितेश बेबीबंपसोबत दिसत आहे. त्यानंतर एका फोटोत रितेश आणि जिनिलिया दोघेही बेबी बंपसोबत दिसत आहेत. हा रितेश आणि जिनिलियाचा आगामी चित्रपट असल्याचे त्यातून कळत आहे. या चित्रपटाचे नाव ‘मिस्टर मम्मी’ असे आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.
आणखी वाचा : ‘ऊ अंतावा’ गाण्याला कंटाळलेल्या नेटकऱ्याचा व्हिडीओ शेअर करत समांथा म्हणाली…
दरम्यान, आता हा चित्रपट नेमका कसा असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. रितेश ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला आहे. तर लवकरच तो अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे.