‘डब्बा’ (दि लंच बॉक्स) या चित्रपटाला ‘कान’ चित्रपट महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता इरफान खानने म्हटले.
भारतीय चित्रपटांमध्ये सार्वभौमिकता दिसून येत असल्याने चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही इरफान म्हणाला. डब्बा चित्रपटाला अंतराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि चित्रपटाची स्तुतीही केली. चित्रपट संपताच चित्रपटगृहात प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत चित्रपटाचे कौतुकही केले. यावरून “भारतीय चित्रपटांत सार्वत्रिक भाषेचे(युनिव्हर्सल लँग्वेज) स्वरूप दिसून येत आहे. अशा चित्रपटांचे जागतिक स्तरावर आकर्षण वाढत आहे.” असेही इरफान डब्बा चित्रपटाबद्दल अधिक माहिती देत म्हणाला.
दिग्दर्शक रितेश बत्रा यांचा ‘डब्बा’ हा पहिलाच असा चित्रपटा आहे की, ज्याने जागतिक स्तरावर आपली वेगळी छाप सोडली आहे.
‘डब्बा’ चित्रपटाला कान महोत्सवात चांगला प्रतिसाद-इरफान खान
'डब्बा' (दि लंच बॉक्स) या चित्रपटाला 'कान' चित्रपट महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता इरफान खानने म्हटले. भारतीय चित्रपटांमध्ये सार्वभौमिकता दिसून येत असल्याने चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही इरफान म्हणाला.
First published on: 03-06-2013 at 08:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good response to dabba movie in cannes festival