बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक राज कपूर यांची आज ९० वी जयंती आहे. आज संपूर्ण बॉलीवूडमध्येच नाही तर गुगलनेही त्यांना आदरांजली दिली आहे. राज कपूर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त त्यांचे गुगल डुडल तयार केले आहे.

गुगलने १९५५ साली प्रदर्शित झालेला राज कपूर यांचा सुपरहिट चित्रपट श्री ४२०मधील एका छायाचित्राचे डुडल तयार केले आहे.  तसेच, त्यावर राज कपूर आणि नरगिस यांचे याच चित्रपटातील गाणे ‘प्यार हुआ इकरार हुआ’मधील प्रसिद्ध छायाचित्राचाही वापर करण्यात आला आहे.  पावसात छत्री घेऊन गाणे बोलणा-या या प्रेमीयुगुलामधील हे अविस्मरणीय दृश्य आजही तितकेच प्रसिद्ध आहे. १४ डिसेंबर १९२४ रोजी पाकिस्तानमधील पेशावर येथे जन्मलेल्या राज कपूर यांचे निधन २ जून १९८८ रोजी झाले. त्यांनी ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ यांचे दिग्दर्शन केले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार , फिल्म फेअर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा