पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांच्या ६७व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांच्या फोटोचे डुडल तयार करून मानवंदना दिली आहे.
नुसरत फतेह अली खान यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९४८ रोजी पाकिस्तानमधील पंजाबच्या लायलपूर येथे पंजाबी मुसलमान कुटुंबात झाला. कव्वाली, गझल, शास्त्रीय, पारंपारिक गायक म्हणून त्यांनी जागतिक स्तरावर नाव मिळवले. नुसरत यांच्या आवाजाची जादू भारतावरही चालली. त्यांनी गायलेली ‘आफरीन आफरीन’, ‘मेरा पिया घर आया’, ‘पिया रे-पिया रे’, ‘सानू एक पल चैन ना आए’, ‘तेरे बिन’ अशी अनेक गाणी आजही तितकीचं प्रसिद्ध आहेत. शिकागो येथे १९९३ साली झालेल्या रॉक कॉन्सर्टमध्ये नुसरत यांनी गाण्यास सुरुवात केली आणि अमेरिकेतील नागरिकही त्यांच्या आवाजावर फिदा झाले. मात्र, नुसरत फतेह अली खान यांना केवळ ४९ वर्षांचेच आयुष्य लाभले. लंडन येथे १६ ऑगस्ट १९९७ साली नुसरत यांनी जगाचा निरोप घेतला.
गायक नुसरत फतेह अली खान यांना गुगल डुडलद्वारे मानवंदना
पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांच्या ६७व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे मानवंदना दिली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 13-10-2015 at 11:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pays tribute to the legendary singer nusrat fateh ali khan with a doodle