यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २०२१ या वर्षातील शेवटचा महिना सुरु आहे. गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे आपण बहुतांश काळ हा घरात घालवला आहे. त्यामुळे अनेक चित्रपट हे डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकतंच गुगलने २०२१ या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. गुगलने जाहीर केलेल्या यादीत शेरशाह हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे.

गुगल दरवर्षी वर्षाच्या शेवटी सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती, चित्रपट यासह विविध गोष्टींची यादी जाहीर करते. या यादीत वर्षभरात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची नोंद असते. नुकतंच गुगलने २०२१ या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांची यादीत पहिल्या क्रमांकावर जय भीम हा चित्रपट पाहायला मिळत आहे.

गेल्यावर्षी २०२० मध्ये हा चित्रपट गुगलच्या सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादी दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र यंदा हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटात तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका आहे. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक झाले. एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळालं होते.

या चित्रपटाने ऑल टाइम सुपरहिट द शॉशंक रिडंप्शन, द गॉडफादर सारख्या चित्रपटांना रेटिंगमध्ये मागे टाकलं आहे. जय भीमने सगळ्या चित्रपटांना मागे टाकत टॉप लिस्टमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. खरतरं जय भीम हा चित्रपट मुळचा तामिळ भाषेत आहे. मात्र, या चित्रपटाला तामिळ भाषेपेक्षा हिंदीत पाहण्यात लोक पसंती देत आहेत. त्यापाठोपाठ गुगलच्या सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत शेरशाह हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी प्रमुख भूमिका आहेत. विष्णु वर्धन दिग्दर्शित ‘शेरशाह ‘ हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे.

‘वेलकम होम’, ‘सख्या रे’ फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म

गुगलच्या सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जय भीम आणि दुसऱ्या क्रमांकावर शेरशाह चित्रपट आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट आहे. त्यापाठोपाठ बेल बॉटम, सूर्यवंशी, दृश्यम 2, मास्टर, भूज हे चित्रपटही गुगल सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत आहे.

Story img Loader