पुनित मल्होत्रा दिग्दर्शित ‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. इमरान खान आणि करिनाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात इमरान आनंदी राहणा-या आणि मस्ती करणा-या मुलाच्या रूपात दिसणार आहे. तर करिनाने, देशात काही बदल घडावा यासाठी झटत राहणा-या मुलीची भूमिका केली आहे. या चित्रपटात ‘चिंगम’ हे आयटम साँगही चित्रीत करण्यात आले आहे.
‘गोरी तेरे प्यार मे’ चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे, तुम्हाला आवडेल अशी आशा आहे… असे पुनित मल्होत्राने ट्विट केले आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूरनेही काम केले आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा