नाटककार काकासाहेब खाडिलकर यांचं ‘सं. मानापमान’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक लखलखता हिरा आहे. गंधर्व नाटक मंडळींपासून ललितकलादर्शपर्यंत अनेक नाट्यसंस्थांनी ते मंचित केलेलं आहे. त्याकाळी एकच नाटक निरनिराळ्या संस्था एकाच वेळी सादर करत असत. आणि लेखकही त्यास परवानगी देत असे. त्यामुळेच ‘सं. मानापमान’ हे नाटक गंधर्व नाटक मंडळी आणि केशवराव भोसले यांची ‘ललितकलादर्श’ या दोन्ही संस्था सादर करीत असत. फक्त त्यांचं कार्यक्षेत्र भिन्न असे. आणि ती मर्यादा सहसा पाळली जात असे. १९२१ साली पहिल्यांदाच एक अघटित घडलं. बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांनी गांधीजींच्या टिळक स्वराज्य फंडासाठी संयुक्त ‘मानापमान’चा प्रयोग सादर केला. त्यावेळी भलतीच खळबळ माजली होती. तो एक सार्वजनिक चर्चेचा विषय झाला होता. खरं तर तसं बघता बालगंधर्वांची कंपनी आणि केशवराव भोसल्यांची कंपनी या एकमेकांच्या स्पर्धक नाटक कंपन्या. अशावेळी या दोघांनी एखाद्या नाटकात एकत्र काम करणं ही अशक्यप्रायच गोष्ट. परंतु टिळकांप्रतीच्या आदरभावामुळे हे दोघे एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त ‘मानापमान’चा प्रयोग सादर केला होता. म्हणूनच या प्रयोगाच्या दंतकथा सर्वत्र प्रसृत झाल्या होत्या. हा इतिहास रसिकांच्या मनोमंचावरून पुसला गेला असला तरी जुन्या रसिकांना या गोष्टीबद्दल सांगोवांगी कुतूहल आहेच. तो एक मोठाच इतिहास आहे. त्याबद्दल दखल घेऊन आजच्या प्रेक्षकांसमोर तो इतिहास ठेवण्याचं महत्कार्य नाटककार अभिराम भडकमकर आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी केलं आहे. खरं तर या दंतकथेचा आशय चित्रपटासाठी अधिक उचित होता, परंतु या जोडीनं हे नाटकही त्याच ताकदीनं सादर केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बालगंधर्व आणि केशवराव दोघेही टिळकांचे चाहते. साहजिकच टिळक फंडाला मदत करण्याची दोघांनाही तीव्र आस. पण करायचं काय? नाटकाचा खेळ लावून त्याचं उत्पन्न फंडाला देणं हा एक मार्ग. पण मग आपलं त्यातलं योगदान काय? तशात गंधर्व कंपनीला उतरती कळा लागलेली. कंपनी कर्जाच्या खाईत बुडालेली. तरीही बालगंधर्वांना टिळक फंडाला मदत करण्याची- तीही घसघशीत- आंतरिक इच्छा. त्यांचे डॉक्टर भडकमकर एक अफलातून कल्पना त्यांच्यासमोर मांडतात. बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांनी एखाद्या नाटकाचा संयुक्त प्रयोग करण्याची! बालगंधर्वांना ही कल्पना भलतीच पसंत पडते. ते लागलीच होकार देतात. पण केशवराव तयार व्हायला हवेत ना? ते राजी होतील… बालगंधर्वांना प्रचंड खात्री. त्यासाठी आपण जातीनं त्यांची भेट घेण्याचं ते ठरवतात. आणि एके दिवशी केशवरावांसमोर दत्त म्हणून उभे ठाकतात. केशवरावांना अत्यानंद होतो. ते लागलीच या प्रस्तावाला होकार देतात. त्यांचे मॅनेजर आणि इतरजन त्यांना यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. पण केशवराव आपल्या निर्णयावर ठाम असतात. ठरतं- ‘सं. मानापमान’चा संयुक्त प्रयोग करायचा. बाकी तपशिलाच्या बाबी ठरतात. केशवराव धैर्यधर आणि बालगंधर्व भामिनी. अनेक जण बालगंधर्वांना केशवरावांच्या आक्रमक गाण्यापुढे आपलं लडिवाळ गाणं फिकं पडेल म्हणून सांगतात. पण बालगंधर्व आपल्या भूमिकेपासून मागे हटत नाहीत. ही बातमी हा हा म्हणता सर्वत्र होते. लोक बुचकळ्यात पडतात. दोघांचे चाहतेही संभ्रमात पडतात. हे काय चाललंय, त्यांना कळत नाही. प्रयोगाची तिकिटं शंभर, पन्नास, पंचवीस, दहा रुपये अशी ठेवायचं ठरतं. पण बालगंधर्वांना हे मान्य होत नाही. ते म्हणतात, ‘हे माझ्या सामान्य रसिकांना कसं काय परवडेल?’ शेवटी त्यांच्या म्हणण्यास्तव शेवटची तिकिटं एक रुपयाची ठेवायचं ठरतं. कारण त्याकाळी सोनंच मुळी १५ रुपये तोळा मिळत होतं. ही तिकिटं खपतील काय, असं अनेकांना वाटत होतं. पण प्लॅन ओपन होताच तिकिटं मिळवण्यासाठी रसिकांची झुंबड उडते. एक रुपयाची तिकिटंही काळाबाजारात दहा रुपयांनी विकली जातात.
हेही वाचा >>> तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
पण मधेच एक तिढा उद्भवतो. लेखक खाडिलकर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही परस्पर प्रयोग कसा जाहीर करता, म्हणून बालगंधर्वांना प्रश्न करतात. ते त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करतात. पण काकासाहेब त्यास ठाम नकार देतात. आता काय करायचं? बालगंधर्व केशवरावांना विचारतात. ते म्हणतात, ‘माझ्याकडे प्रयोगाची परवानगी आहे. आपण बिनधास्त प्रयोग लावू. काकासाहेब आपल्या शिष्यांवर चिडले असले तरी प्रयोगाला आडकाठी आणणार नाहीत.’ तसंच होतं. प्रयोग हाऊसफुल्ल गर्दीत सादर होतो. रसिकांच्या डोळ्यांचे आणि कानांचेही पारणे फिटते. प्रयोगात एका प्रसंगात बालगंधर्व केशवरावांचे जोडे उतरवतात. त्याक्षणी केशवराव प्रयोगातून बाहेर येत बालगंधर्वांना ‘आपण हे काय करता आहात?’ असं विचारतात. त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण बालगंधर्व म्हणतात, ‘मी आपले नव्हे, तर धैर्यधराचे जोडे उतरवतो आहे. त्यात माझा अपमान कसला?’ प्रयोग संपतो. प्रयोगाला तब्बल १६,८०० रुपयांचं बुकिंग झालेलं असतं. दोघांनाही धन्य धन्य वाटतं. केशवराव बालगंधर्वांसमोर प्रस्ताव ठेवतात… ‘आता इतरही नाटकांचे असेच संयुक्त प्रयोग लावूया आणि आपल्या कंपनीवरील कर्जाचा बोजा उतरवूया.’ बालगंधर्वांना भरून येतं.
पण हे होणे नव्हते. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी केशवराव विषमज्वराने जातात आणि त्यांचे हे शब्द अधुरेच राहतात. बालगंधर्वांना याचं कमालीचं दु:ख होतं. आपण ठरवतो काय आणि नियती करते काय!
शंभरहून अधिक वर्षांपूर्वीचं हे नाटक घेऊन नाटककार अभिराम भडकमकर दीर्घकाळानंतर या नाटकाद्वारे रंगभूमीवर अवतीर्ण झालेत… तेही चरित्रनाट्याचा बाज घेऊन. अर्थात चित्रपटांतून त्यांनी हा बाज लीलया पेलला आहेच. ‘संयुक्त मानापमान’मधील नाट्यपूर्ण क्षण त्यांनी हेरले आणि या नाटकाचा घाट त्यांनी घातला. ‘संयुक्त मानापमान’ हा मराठी रंगभूमीवरील एक ऐतिहासिक ऐवज आहे. त्यात गुंतलेल्या व्यक्ती, तो काळ, त्याने घडवलेला इतिहास… सगळंच चित्तचक्षुचमत्कारिक! दोन स्पर्धक गुणी, दिग्गज कलावंतांना एकत्र आणणारी ही दुर्मीळ घटना. त्यातलं नाट्य खचितच मोहवणारं. अभिराम भडकमकर यांनी त्यातले नाट्यपूर्ण क्षण मार्मिकपणे टिपले आहेत. तो काळ उभा करताना त्यावेळची माणसं, त्यांचे राग-लोभ, हर्ष-खेद, मोठेपण, मनस्वीता, काहीएक घडवून आणण्याची जिद्द, मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे यांचं एक इंद्रधनुष्यच जणू त्यांनी चितारलं आहे. प्रथमार्धात ‘संयुक्त मानापमान’ची कल्पना कशी प्रत्यक्षात येत गेली, त्यातले खाचखळगे आणि उत्तरार्धात प्रत्यक्ष प्रयोगाची रंगत त्यांनी चितारली आहे. डॉक्युड्रामाच्या पल्याड जात त्यांनी हे साध्य केलं आहे. मोजके प्रसंग, व्यक्ती, त्यांच्यातली परस्पर देवाणघेवाण, त्यातून घडणारं नाट्य यावर त्यांनी भर दिला आहे. दुसर्या अंकात प्रत्यक्ष ‘प्रयोग’च चित्रित करावयाचा असल्याने त्यात संपादनाची करामतच केंद्रस्थानी होती. तीही त्यांनी समर्थपणे पेलली आहे. एका अनवट ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार त्यांनी आजच्या प्रेक्षकांना केले आहे.
दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनीही तितक्याच ताकदीनं ही ऐतिहासिक घटना प्रयोगान्वित केली आहे. त्यातल्या पात्रांचे स्वभावविभाव, त्यांच्या लकबी, तो काळ, मनस्वी कलावंतांचे मोठेपण हे सारं दोन-सव्वादोन तासांच्या अवधीत मंचित करायचं हे येरागबाळ्याचं काम नव्हतं. पण हृषिकेश जोशी यांनी ते उत्कटरीत्या चोख बजावलं आहे. प्रत्येक पात्र त्याच्या त्याच्या वैशिष्ट्यांसह जिवंत होईल हे त्यांनी पाहिलं आहे. काळाचे संदर्भही त्या जोडीनं प्रत्यक्षात दिसतील हे ‘केसरी’ वृत्तपत्र, तत्कालीन वेशभूषा, वागणं-बोलणं यांतून त्यांनी ठसवलं आहे. बालगंधर्व आणि केशवराव भोसले या व्यक्तिरेखा दुहेरी पात्ररचनेतून व्यक्ती आणि कलावंत म्हणून त्यांनी साक्षेपानं उभ्या केल्या आहेत. त्यांचं नितळपण आरस्पानी केलं आहे. संगीत रंगभूमीचं वैभवही त्याच दिमाखात त्यांनी प्रयोगात साकारलं आहे.
प्रदीप मुळ्ये यांनी नाटक कंपन्यांची तत्कालीन बिऱ्हाडं आणि ‘सं. मानापमान’च्या प्रयोगात रंगवलेले पडदे वापरून नेपथ्यात वास्तवदर्शीत्व आणलं आहे. प्रकाशयोजनेचाही त्यांनी सूक्ष्म विचार नाटकभर केलेला जाणवतो.
कौशल इनामदार यांनी तत्कालीन पदांचा बाज कायम राखत नव्या प्रयोगास संगीत दिलं आहे. त्यातला गोडवा, मुलायम ताना, हरकती रिझवर्णा या आहेत. ही पदं गतवैभवाची आठवण करून देतात. फक्त केशवरावांची आक्रमक शैली मात्र यात जाणवत नाही. मयुरा रानडे (वेशभूषा), राजेश परब- मनिष दारोलीकर (रंगभूषा) आणि ज्योती सातपुते (केशभूषा) यांनी पात्रांना बाह्यरूप देण्यात कसलीही कसर सोडलेली नाही.
असंख्य पात्रांचं हे नाटक असल्याने प्रत्येक कलाकाराने एकाच वेळी विविध भूमिका साकारल्या आहेत. बालगंधर्वांच्या भूमिकेत आशीष नेवाळकर यांनी सौम्य, सुशील व्यक्तिमत्त्वाचे, रसिकांना मायबापास्थानी मानणारे, लडिवाळ, उदारमनस्क महानुभाव उत्कटतेनं साकारले आहेत. त्याविरुद्ध व्यक्तिमत्त्वाचे केशवराव भोसले- ऋषिकेश वांबुरकर यांनी त्यांच्या रोखठोक, व्यवहारकुशल, पण दिलदार वागण्या-बोलण्यातून छान रंगवले आहेत. परस्परांबद्दलचा आदरभाव, विश्वास दोघांच्याही वृत्तीचा स्थायीभाव वाटतो. त्यांचीच पुढे ‘सं. मानापमान’मधील भामिनीची भूमिका अजिंक्य पोंक्षे आणि ओंकार प्रभुघाटे (धैर्यधर) यांनी मोठ्या नजाकतीने पेलल्या आहेत. त्यावेळचे बालगंधर्व आणि केशवराव त्यांचे हावभाव, स्वभावविभाव आणि लालित्यपूर्ण गाण्यांतून तितक्याच तीव्रतेनं व्यक्त होतात. विशेषत: बालगंधर्वांच्या अदा आणि गायकी अजिंक्य पोंक्षे यांनी यथातथ्य उभी केली आहे. ‘मूर्तिमंत भीती उभी’, ‘संपदा चपल चरण’, ‘खरा तो प्रेमा’, ‘धनराशी जाता मूढापाशी’ आणि ‘नाही मी बोलत नाथा’ या पदांतील भावदर्शन त्यांनी अप्रतिम चितारले आहे. धैर्यधर झालेल्या ओंकार प्रभुघाटे यांनीही ‘चंद्रिका ही जणू’, ‘युवती मना’, ‘शूरा मी वंदिले’, ‘रवी मी चंद्र कसा’, ‘प्रेम सेवा शरण’ ही पदं त्यातल्या अर्थवाहितेसह उत्तम गायलीत, परंतु त्यांत केशवरावांची आक्रमक शैली मात्र जाणवली नाही. अश्विनी जोशी यांनी नटी आणि संसारी स्त्री तिच्या लटक्याझटक्यांसह फर्मास उभी केली. आशीष वझे (डॉ. भडकमकर आणि अन्य भूमिका), निरंजन जाविर (शितूत ), प्रद्युम्न गायकवाड (काकासाहेब खाडिलकर व अन्य), ऋत्विज कुलकर्णी (बखलेबुवा व अन्य), श्रीराम लोखंडे (यंदे व अन्य), परमेश्वर गुट्टे (कुंटे व अन्य), श्यामराज पाटील (बोडस व अन्य) या सर्वांनीच आपापल्या भूमिकांचा आब आणि लकबी उत्तमरीत्या पेेश केल्या आहेत. ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ पाहून एक अविस्मरणीय नाट्यानुभव पदरी पडल्याचं समाधान घेऊन रसिक प्रेक्षागृहाबाहेर पडतो, यात तीळमात्र शंका नाही.