सोनल प्रॉडक्शन व नाटय़सुमन निर्मित, मिहिर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित तसेच मंगेश कदम, लीना भागवत आणि शशांक केतकर अभिनित ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी प्रयोग रविवार, १७ मे रोजी दुपारी ४ वा. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात संपन्न होणार आहे. रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने होणाऱ्या या आनंद सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे यानिमित्ताने वेगळ्या वाटने जाणाऱ्या मराठी चित्रपटांचा आणि त्यांच्याशी संबंधित सर्जनशील मंडळींचेखास कौतुक करण्यात येणार आहे. त्यांत अभिनेते किशोर कदम (‘फँड्री’), चित्रपट लेखिका मधुगंधा कुलकर्णी (‘एलिझाबेथ एकादशी’), अभिजीत पानसे (‘रेगे’), गीतांजली कुलकर्णी (‘कोर्ट’) यांचा समावेश
आहे.
त्याचबरोबर ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ या सध्या तरुणाईच्या गाजत असलेल्या मालिकेतील कलाकारांचासुद्धा सत्कार करण्यात येणार आहे.
मराठी रंगभूमीला साहाय्यभूत होणाऱ्या प्रसारमाध्यमांतील नाटय़समीक्षक जयंत पवार, संजय डहाळे, रवींद्र पाथरे, झी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांच्यासह ‘चला, हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे कलाकार, तसेच चॅनेल क्षेत्रातील अमित भंडारी, अजय परचुरे, रोहन राणे, प्राची वैद्य, श्रेयस सावंत, प्रशांत अनासपुरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
या कौतुक सोहळ्यास ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, साहित्यिक विजया राजाध्यक्ष, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेत्री वंदना गुप्ते, सविता प्रभुणे, सोनाली कुलकर्णी, कविता लाड-मेढेकर, नाटय़निर्माते प्रसाद कांबळी, सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर, महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आदी मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
‘गोष्ट तशी गमतीची’चा कृतज्ञता व आनंद सोहळा
सोनल प्रॉडक्शन व नाटय़सुमन निर्मित, मिहिर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित तसेच मंगेश कदम, लीना भागवत आणि शशांक केतकर अभिनित ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी प्रयोग रविवार, १७ मे रोजी दुपारी ४ वा. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात संपन्न होणार आहे.
First published on: 17-05-2015 at 12:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta tashi gamtichi