हमे भी ऐसा ‘सहारा’ चाहिए
चित्रीकरण व रोजच्या धावपळीतून आलेला शिणवटा घालवण्यासाठी अलीकडेच सहारा वाहिनीवरील सर्व कलाकांरांनी अलीबाग येथे जाऊन तुफान धम्माल केली. खाओ पिओ ऐश करो असे काहीसे वातावरण तिथे होते. अलिबागच्या नितांतसुंदर समुद्रकाठी असलेल्या त्या रिसॉर्टमध्ये सहारातील सर्व कलाकारांनी जीवाची मुंबई नव्हे अलीबाग केली. यामध्ये बाल हनुमानाची भूमिका करणारा राज भानुषाली पासून ते थेट पंकज तिवारी, सचिन श्रॉफ, रेशमी घोष आदी सर्व कलाकार सहभागी झाले होते. आज तोंडाला रंग फासून कॅमेऱ्यासमोर येऊन उभे राहायचे नाही त्यामुळे कुछ भी करो असा काहीसा सर्वाचा अविर्भाव होता. सहाराने या सर्व कलाकारांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेकांनी त्याचा मनसोक्तपणे फायदा उठविला. काहीजण तर तासनतास स्विमिंगपूलमध्ये डुंबून होते. अर्थात एक दिवसाच्या ट्रीपची मजा रंगात येत असतानाच आताा परत जावे लागणार असे सर्वाना सांगण्यात आले. डीजेवर थिरकरणारी पावले अचानक स्तब्ध झाली. अरे यह दिन तो जल्ही खतम हुआ अशी प्रतिक्रियाही काही कलाकारांनी त्वरित व्यक्त केली. या धम्माल ट्रीपची खबर लगोलग अन्य स्पर्धक वाहिनीवरील अन्य कलाकारांना लागली आणि ते चांगलेच हळहळले. काश हमे भी ऐसा ‘सहाारा’ अगर मिल गया होता तो क्या होता अशी प्रतिक्रियाही कांहींनी यानिमित्ताने व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा