हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेता गोविंद नामदेव हे बाळ गंगाधर टिळकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आगामी ‘चाफेकर ब्रदर्स’ चित्रपटात ते काम करत आहेत.
स्वांतत्र्यसैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल आपल्याला गर्व आहे असे त्यांनी म्हटले. गोविंद म्हणाले की, ही भूमिका साकारताना मला विविध छटा दिसून आल्या. मला टिळक साकारण्यास मिळाल्याचा गर्व वाटतोय. मी जेव्हा कधी अशी ऐतिहासिक पात्र साकारली तेव्हा मी अधिकाधिक परिपक्व होत गेलो. अशा चित्रपटांतून माझ्या ज्ञानात तर भर झालीचं पण माझ्यातील माणूसही त्यामुळे जागा झाला. ‘चाफेकर ब्रदर्स’ चित्रपट केल्याने मी समाधानी आहे. याआधी नामदेव यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली होती.

Story img Loader