ज्येष्ठ सिनेनिर्माते गोविंद निहलानी यांनी त्यांची १९९४ ची निर्मिती ‘द्रोहकाल’चा उत्तरभाग बनवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
‘द्रोहकाल’मध्ये दहशतवादाविरोधामध्ये देशाने केलेल्या संघर्षाची कहानी आहे. एका प्रामाणीक पोलीस अधीकाऱ्याला दहशतवाद्यांच्या निर्दयी गटाचा सामना करताना कोणत्या मानसिक आघातांना सामोरे जावे लागते त्यावर भाष्य केले.
“लोक देखील मला ‘द्रोहकाल’च्या उत्तरभागाची निर्मितीकरून ही कथा पुढे घेऊनजाण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, ‘द्रोहकाल’चे काम लगेच हातामध्ये घेता येणार नसले तरी मी त्याचा विचार करत आहे”, असे निहलानी म्हणाले.
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द्रोहकाल’चे समीक्षकांनी सकारात्मक समीक्षण केले होते. अभिनेते आशिष विद्यार्थी यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्याचे ‘राष्ट्रीय चित्रपट पारितोषीक’ देवून गौरवण्यात आले होते.
दरम्यान, निहलानी त्यांची १९८३ची निर्मिती असलेल्या ‘अर्धसत्य’चा उत्तरभाग बनवण्यात व्यस्त आहेत. ओम पूरी, स्मिता पाटील, नसरूद्दीन शहा, सदाशीव अमरापूरकर आणि अमरिश पूरी यांच्या भूमिका असलेल्या ‘अर्धसत्य’ला चांगले यश मिळाले होते. पोलिसांच्या जीवनावरील ‘अर्धसत्य’ आजवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला व त्याला बरिच पारितोषीके देखील मिळाली.
“आम्ही ‘अर्धसत्य’च्या पटकथेवर काम करत असून, अद्याप कोणत्याही अभिनेत्यांशी चर्चा झालेली नाही. मात्र, ओम पूरी यांनी ‘अर्धसत्य’च्या उत्तरभागामध्ये भूमिका करावी त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्व व्यवस्थित झाल्यास येत्या दिवाळीमध्ये चित्रिकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे”, असे निहलानी म्हणाले.                  

Story img Loader