येणार येणार म्हणताना गोविंदाची मुलगी नर्मदा पंजाबी सुपरस्टार गिप्पीबरोबरच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या वृत्ताने अभिनेता गोविंदा कमालीचा त्रस्त झाला. या वृत्ताचे खंडण करत, अशाप्रकारच्या वृत्ताबाबत गोविंदाने एक पालक म्हणून चिंता व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना गोविंदा म्हणाला, मी फार दु:खी आहे. या सर्व प्रकारामुळे माझ्या मुलीला वेदना होत आहेत, तिला अशा परिस्थितीत पाहून मला फार दु:ख होते. नर्मदाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत परत परत बातम्या छापून येत असून, सरते शेवटी ते असत्य ठरते. यासर्वाचा तिच्या संभाव्य बॉलिवूड कारकीर्दीवर विपरित परिणाम होत आहे. बॉलिवूडमधील तिच्या पदार्पणासाठी मी आणि नर्मदाने खूप वाट पाहिली आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची घाई नाही. चांगली संधी मिळेपर्यंत वाट पाहात राहणार असल्याचेदेखील त्याने सांगितले.

Story img Loader