बॉलीवूडचा कॉमेडी किंग गोविंदा ‘यश राज फिल्म’च्या आगामी ‘किल दिल’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असलो तरी, खलनायकाच्या भूमिकेला चित्रपटात जणू नायकाचा साज चढवण्याची किमया यश राज बॅनरने साधली असल्याचे गोविंदाने म्हटले आहे. त्यामुळे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत जरी गोविंदा असला तरी, प्रेक्षकांवर नायकाची छाप सोडून जाणारे पात्र तो साकारत असल्याचे बोलले जात आहे.
खलनायकी भूमिकेचा बाज मला जमू शकेल असे वाटते नव्हते पण, आपल्या पत्नीने प्रोत्साहित केल्याने ही भूमिका साकारली असल्याचे गोविंदा यावेळी म्हणाला. तसेच जेव्हा चित्रपटातील माझे पात्र मला समजवण्यात आले तेव्हा, “ये अच्छा व्हिलन है भाय, जो हिरो की तरह लग रहा है.” अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती, असेही गोविंदा पुढे म्हणाला.
‘किल दिल’ चित्रपटातील भूमिकेबद्दल उत्सुकता असून प्रोमो पाहून प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याचेही गोविंदाने सांगितले. ‘किल दिल’ चित्रपटात गोविंदासोबत अभिनेता रणवीर सिंग, अली जफर आणि परिणीती चोप्रा यांच्या भूमिका आहेत. 

Story img Loader