बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडमध्ये गोविंदा आणि त्याच कुटुंब हजेरी लावणार आहे. तर या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला आहे. गेल्या वर्षीदेखील जेव्हा गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये कृष्णा दिसला नव्हता. ‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले की ‘त्या दोघांना ही एका स्टेजवर एकत्र येण्याची इच्छा नाही. तर त्या दोघांमध्ये असलेला वाद अजून संपलेला नाही.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर गोविंदाने कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही, तर त्याची पत्नी सुनीता अहुजा यांनी ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाच्या या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘कृष्णा अभिषेकने त्या एपिसोडचा भाग न राहण्याचे कारण माझं कुटुंब असल्याचे सांगितले, यामुळे मला फार दु:ख झालं आहे. कृष्णा म्हणाला की त्याला आणि आम्हाला एका स्टेजवर येण्याची इच्छा नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोविंदाने एक स्टेटमेंट जारी केले होते आणि आपली बाजू मांडली होती, त्यासोबतच घरात सुरु असलेल्या गोष्टी लोकांसमोर आणणार नाही असे म्हटले होते. गोविंदा यांनी कोणत्या ही प्रकारे कुटुंबातील गोष्टींवर चर्चा केली नाही. मला पुन्हा एकदा सांगायची इच्छा आहे की आम्हाला एकमेकांमध्ये असलेले अंतर तसेच ठेवायचे आहे. मात्र, आता यावर चर्चा ही मर्यादेच्या बाहेर गेली आहे, त्यामुळे मला वाटले की आता या विषयावर बोलायला हवे.’

सुनीता म्हणाल्या, ‘जेव्हा जेव्हा आम्ही शोमध्ये येतो, तेव्हा तो प्रसिद्धीसाठी माध्यमांमध्ये आमच्याबद्दल काही ना काही बोलतो. हे सगळं करूण काय फायदा? घरातल्या गोष्टी लोकांसमोर आणण्यात काही अर्थ नाही. गोविंदा यावर काही बोलू किंवा प्रतिक्रिया देऊ शकत नाही पण यामुळे मला खूप राग येतो. त्याच्याशिवायही, आमचा शो हिट आहे आणि हा सुद्धा होईल.’

आणखी वाचा : ‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण

सुनिता पुढे म्हणाल्या, ‘कृष्णाकडे कॉमेडीची प्रतिभा ही फक्त त्याच्या मामा गोविंदाचं नाव घेण्यापुरती मर्यादित आहे. तो म्हणतो, माझा माझा असा, माझा मामा असं करतो, मामाचं नाव घेतल्या शिवाय तो लोकप्रिय होऊ शकतो, एवढी प्रतिभा त्याच्याकडे नाही?

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटली पाहिजे…’, वृद्ध व्यक्तीला मदत न केल्यामुळे श्रद्धा कपूर झाली ट्रोल

काय आहे वाद?

३ वर्षांपूर्वी कश्मिरा शाहने एक ट्वीट केले होते. यात तिने ‘काही लोक पैशासाठी नाचत होते’ असे म्हटले होते. सुनीता यांना वाटले की हे ट्वीट पती गोविंदासाठी आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील तणाव वाढला. सुनीता सांगतात की गेल्या ३ वर्षात वाद इतका वाढला आहे की आता त्याला विसरण्याचा किंवा कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. सुनीता म्हणाल्या, ‘असे कधीच होणार नाही. ३ वर्षांपूर्वी मी म्हणाले की मी जिवंत असताना हे संपणार नाही. कुटुंबाच्या नावाने, आपण गैरवर्तन करू शकत नाही किंवा चुकीचा फायदा घेऊ शकत नाही. आम्ही लहानाचे मोठे केले म्हणून तुम्ही आता डोक्यावर बसू शकत नाही. माझ्या सासूबाईंचे निधन झाल्यानंतर आम्ही कृष्णाला घर सोडायला सांगितले असते तर? ज्यांनी त्याला लहानाचे मोठे केले आहे, तो त्यांचा अपमान करत आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की हा वाद कधीच संपणार नाही. मला त्याचा चेहरा पुन्हा कधीच पाहायचा नाही.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda wife sunita ahuja blasts krushna abhishek says dont want to see his face again in my life dcp