आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अनेकांना भुरळ घालणा-या अभिनेता गोविंदाची मुलगी नर्मदा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ची ची म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेला गोविंदा आपल्या मुलीच्या योग्य पदार्पण चित्रपटाची वाट पाहतोय. अखेर, नर्मदा ३० चित्रपट नाकारल्यानंतर पंजाबी अभिनेता गिप्पी गरेवालसोबत चित्रपट करत असल्याचे वृत्त आहे.
सध्या, बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेली नर्मदा लंडन फिल्म इन्स्टिट्यूडमध्ये शिकतेय. गिप्पी हा पंजाबी चित्रपटांमध्ये प्रसिद्ध असून, या दोघांचा चित्रपट बॉलीवूडमध्येही प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचे शिर्षक अद्याप ठरले नसून, याच्या चित्रीकरणास ऑगस्टमध्ये सुरुवात होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govindas daughter to debut with punjabi superstar