Grammy Awards 2025: दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ सोहळा पार पडला. संगीत विश्वातील अत्यंत महत्त्वाचा असणारा ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ सोहळा लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो टाउन एरिया येथे आयोजित करण्यात आला होता. यंदा ग्रॅमी सोहळ्याचं ६७वं वर्ष होतं. २ फेब्रुवारीला झालेल्या या प्रतिष्ठित सोहळ्याचं आज भारतात प्रीमियर झालं. सकाळी ६.३० वाजल्यापासून ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ सोहळा स्ट्रीमिंग झाला.

यंदाच्या ‘ग्रॅमी पुरस्कार’च्या विजेत्यांमध्ये टेलर स्विफ्टपासून बियॉन्सेपर्यंत अनेक सेलिब्रिटी होते. संगीत विश्वातील कोण-कोणत्या सेलिब्रिटींना ‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’ने गौरविण्यात आलं? जाणून घ्या…

  • सर्वोत्कृष्ट गीतकार ( नॉन क्लासिकल ) – एमी एलन ( Ammy Allen )
  • सर्वात्कृष्ट निर्माता ( नॉन क्लासिकल ) – डेनियल निगरो ( Daniel Nigro )
  • सर्वोत्कृष्ट गाणं ( देश ) – केसी मुसग्रेव्स ( Kacey Musgraves )
  • सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम ( एलिगेटर बाइट्स नेव्हर हील गाणं ) – डोएची ( Doechii )
  • सर्वोत्कृष्ट पॉप व्होकल अल्बम ( शॉर्ट एंड स्वीट गाणं ) – सबरीना कारपेंटर ( Sabrina Carpenter )
  • सर्वोत्कृष्ट गॉस्पल परफॉर्मन्स/ गाणं – वन हेललूजाह ( One Halleujah )
  • सर्वोत्कृष्ट अल्बम ( देश ) ( काउब्बॉय कार्टर गाणं – बियॉन्से ( Beyonce )
  • सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम ( हॅकनी डायमंड्स गाणं ) – द रोलिंग स्टोन ( The Rolling Stones )
  • सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार – चापेल रोअन ( Chappel Roan )
  • सर्वोत्कृष्ट लॅटीन पॉप अल्बम ( लास मुजेरेस या नो लिबरन गाणं ) – शकीरा ( Shakira )
  • सर्वोत्कृष्ट मेलोडिक रॅप परफॉर्मन्स ( ३ एएम गाणं ) – रॅप्सडी ( Rapsody )
  • सर्वोत्कृष्ट पॉप ड्युओ/ग्रुप परफॉर्मन्स ( डाय विथ अ स्माइल ) – लेडी गागा ( Lady Gaga ) आणि ब्रून मार्स ( Bruno Mars )
  • सर्वोत्कृष्ट गाणं ( नॉट लाइक अस ) – केंड्रिक लमर ( Kendrick Lamar )
  • सर्वोत्कृष्ट अल्बम ( काउब्वॉय कार्टर गाणं ) – बियॉन्से

‘ग्रॅमी पुरस्कार २०२५’मध्ये कोणी-कोणी परफॉर्म केला?

‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्यात अनेक कलाकारांनी आपल्या दमदार परफॉर्मन्सने चार चाँद लावले. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये परी होऊन ‘ग्रॅमी पुरस्कार’ विजेती सबरीना कारपेंटरने परफॉर्मन्स केला. सबरीना व्यतिरिक्त शाबूजे, डोएची, बेंसन आणि चापेल रोअनसारख्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स करून सोहळ्याची रंगत वाढवली.

Story img Loader