ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्करनंतर आता नुकतीच यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली. सध्या या पुरस्कारांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेच. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकार रिकी केज यांना त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. यावेळी रिकी यांच्या एका कृतीनं भारतीयांची मनं जिंकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६४ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रिकी केज यांच्यामुळे सर्व भारतीयांची मान उंचावली. भारतीय संगीतकार रिकी केज यांना त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमसाठी ६४ व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांत नामांकन मिळालं होतं. हा पुरस्कार रिकी यांना मिळाला तो क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा तर होताच पण यासोबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेलेल्या रिकी यांच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली. मंचावर गेल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्याआधी रिकी यांनी सर्व उपस्थितांना भारतीय परंपरेनुसार हात जोडून नमस्कार करत ग्रीट केलं. ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा- ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर भारतीय नाराज, लता मंगेशकर यांना श्रद्धांजली न वाहिल्यानं चाहत्यांनी व्यक्त केली खंत

ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानंतर रिकी केज यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी या पुरस्कार सोहळ्याचे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘माझा अल्बम ‘डिव्हाइन टाइड्स’साठी मला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. माझ्यासोबत उभ्या असलेल्या या महान कलाकाराप्रती मी कृतज्ञ आहे. माझा हा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे आणि स्टीवर्डचा सहावा पुरस्कार आहे. माझ्या कामात सहकार्य करणाऱ्या, माझी गाणी ऐकणाऱ्या सर्वांचेच खूप आभार, तुमच्या सर्वांमुळेच मी आज या ठिकाणी उभा आहे.’

आणखी वाचा- सलमान- अक्षय- सैफ पोहोचले शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर, वाचा नेमकं काय घडलं

दरम्यान रिकी केज यांच्या हा वैयक्तीक दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे. याआधी त्यांनी २०१५ मध्येही ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. ‘विंड्स ऑफ संसार’ या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. इतकेच नाही, तर त्या वेळी यूएस बिलबोर्ड न्यू एज अल्बम चार्टवरही या अल्बमने पहिले स्थान पटकावले होते. या चार्टवर पदार्पण करणारे रिकी पहिले भारतीय ठरले होते. रिकी केज यांच्या नावावर सर्वात तरुण भारतीय म्हणून ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे. रिकी यांच्या व्यतिरिक्त फक्त ३ भारतीयांनी हा पुरस्कार जिंकला आहे. या यादीत ए आर रहमान, रविशंकर, झाकीर हुसेन यांच्या नावांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grammys 2022 indian music composer ricky kej won his second grammy this year mrj