Grammys Award 2025 : ६७ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय तबलावादक आणि चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते झाकीर हुसैन यांना ‘इन मेमोरियम’ सेगमेंटमधून ( श्रद्धांजली विभाग ) वगळण्यात आल्याबद्दल संगीत प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. आयोजकांच्या या मोठ्या चुकीवर सोशल मीडियावर टीका होत आहे. रेकॉर्डिंग अकादमीने आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा रविवारी लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम अरेना येथे आयोजित करण्यात आला होता.

दरवर्षी, ग्रॅमी पुरस्कार आयोजनकर्ते त्यांच्या ‘इन मेमोरियम मोंटेज’मध्ये संगीत क्षेत्रात अमूल्य कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना श्रद्धांजली वाहतात. झाकीर हुसैन यांचं गेल्यावर्षी निधन झालं. एकाच वर्षी एकूण ३ ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे झाकीर हुसैन हे पहिले भारतीय होते. गेल्यावर्षी १५ डिसेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे त्यांचं निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते.

Ashok Saraf
“नशीब काढलंय मी…”, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकलाकाराची खास पोस्ट; म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde on Anjali Damania
Dhananjay Munde : अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काय ठरलं? धनंजय मुंडे म्हणाले…
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल
Ranji Trophy 2025 Shardul Thakur scored a century for Mumbai against Jammu and Kashmir
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकूरचं दमदार शतक… पुन्हा एकदा मुंबईला तारलं
Uddhav Thackeray-Sharad Pawar meeting,
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट, महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार
Dhananjay Munde
“महायुतीतील नेत्यांकडूनच माझ्याविरोधात…”, अजित पवारांसमोर धनंजय मुंडेंनी मांडली व्यथा; बीडमधील हत्या प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले…

ग्रॅमीच्या ‘इन मेमोरियम’ विभागात, जेव्हा निधन झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती, तेव्हा झाकीर हुसैन यांचं नाव त्यात नव्हतं. यावर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चाहत्यांनी देखील आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच रेकॉर्डिंग अकादमीला टॅग करून या चुकीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

“ग्रॅमीच्या ‘इन मेमोरियम’ सेगमेंटमध्ये झाकीर हुसैन यांचं नाव कसं नव्हतं? ते गेल्यावर्षीचे विजेते आहेत”, “श्रद्धांजली विभागात त्यांचा उल्लेख न करणं ही खरोखरच एक मोठी चूक आहे”, “ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि अनेकदा ग्रॅमीचं नामांकन मिळूनही झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली विभागामध्ये समाविष्ट न करणं ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे.” असं युजर्सनी एक्स पोस्ट करत म्हटलं आहे.

Grammys Award 2025
सोशल मीडियावर संताप

दरम्यान, या वर्षीच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अनेक महान संगीतकारांना आदरांजली वाहण्यात आली, ज्यात लियाम पेन, क्रिस क्रिस्टोफरसन, सिसी ह्यूस्टन, टिटो जॅक्सन, जो चेंबर्स, जॅक जोन्स, मेरी मार्टिन, मारियान फेथफुल, सेजी ओझावा आणि एला जेनकिन्स यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

Story img Loader