स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’मध्ये पाडव्याचा गोडवा पाहायला मिळणार आहे. सहकुटुंब गुढी उभारत या दोन्ही मालिकेतील कलाकारांनी मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. ‘ललित २०५’च्या राजाध्यक्ष कुटुंबासाठी हा सण आणि येणारं नवं वर्ष खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे. आजवर नील, भैरवी आणि सुमित्रा आजीने मिळून प्रत्येक संकटाचा सामना केलाय. आता मात्र संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंब एकत्र आलंय, त्यामुळे आनंदाचे आणि सुखाचे क्षण पुन्हा परत येतील याचा विश्वास संपूर्ण कुटुंबाला आहे. यानिमित्ताने राजाध्यक्षांच्या सुनांनी खास गोडाचा बेतही केलाय. त्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने सेटवर खरंखुरं सेलिब्रेशन करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छत्रीवाली’ मालिकेतही उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला. विक्रम आणि मधुरा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे यंदा गुढी उभारण्याचा मान गायकवाड कुटुंबाने मधुराला दिला. पारंपरिक पद्धतीने गुढीची पुजा करत मधुराने या सणाचा गोडवा वाढवला.

या मालिकेत विक्रमची भूमिका साकारणाऱ्या संकेत पाठकने यानिमित्ताने गुढीपाडव्याची एक खास आठवण शेअर केली. ‘मी मुळचा नाशिकचा आहे. माझ्या घरी दरवर्षी जल्लोषात गुढी उभारली जाते. लहानपणी मी माझी स्वत:ची वेगळी गुढी उभारायचो. गुढीचे छोटे दागिने, छोटी साडी याचं विशेष कौतुक वाटायचं. आता शूटिंगमुळे घरी गुढी उभारण्यासाठी जाणं शक्य होत नाही. पण सेटवरच्या या सेलिब्रेशनमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना संकेतने व्यक्त केली.’

‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’ मालिकेतलं हे मराठमोळं सेलिब्रेशन सायंकाळी ६ वाजता आणि रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2019 celebration on the sets of lalit 205 and chhatriwali