‘बॉबी जासूस’ या आगामी चित्रपटात विद्या बालन वेगवेगळ्या २-४ नव्हे तर तब्बल १०० हून अधिक रूपांमध्ये दिसणार आहे.  विद्या बालनचा हा नवा अवतार पाहिल्यानंतर ‘डर्टी पिक्चर’मधील हीच का ती विद्या बालन असा प्रश्न सर्वानाचा पडू शकतो. ‘बॉबी जासूस’मध्ये विद्या एका खासगी गुप्तहेराची भूमिका करत असून त्यामुळेच ती वेगवेगळे अवतार धारण करणार आहे. तिचा एक ‘अवतार’ ज्योतिषाचा आहे. बारीक काचांचा चष्मा, जाड मिशी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि धोतर-कुर्ता अशा पेहेरावातील विद्याला ओळखणे सहजशक्य नाही. महिला गुप्तहेराचा प्रवास या ‘बॉबी जासूस’मध्ये दाखविण्यात आला असून त्याचा ट्रेलर २-४ दिवसांत प्रदर्शित होत आहे.

Story img Loader