Gulabi Sadi Fame Actress Prajakta Ghag : ‘गुलाबी साडी’ या गाण्याने २०२४ मध्ये संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. मराठमोळ्या संजू राठोडचं हे गाणं जगभरात ट्रेडिंग होतं. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत सगळेच सोशल मीडिया स्टार या गाण्यावर थिरकले होते. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या वरातीत सुद्धा बॉलीवूड सेलिब्रिटी ‘गुलाबी साडी’ गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसले होते.

‘गुलाबी साडी’ गाण्याला वर्ष उलटून गेलं तरी आजही याची लोकप्रियता कायम आहे. संजू राठोड या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आला. मात्र, संजूप्रमाणे या गाण्यात मुख्य भूमिकेत झळकलेली नायिका सुद्धा सर्वत्र चर्चेत आली आहे.

‘गुलाबी साडी’ या गाण्यात अभिनेत्री प्राजक्ता घाग संजू राठोडसह प्रमुख भूमिकेत झळकली होती. अभिनेत्रीने यापूर्वी संजूबरोबर ‘नऊवारी पाहिजे’ आणि ‘कसं डिंपल येतय गालावरी’ या गाण्यांमध्ये देखील काम केलेलं आहे. ‘गुलाबी साडी’ गाण्यातील संजू आणि प्राजक्ताची जुगलबंदी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सध्या प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याबद्दलची एक खास बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्राजक्ता घागने काही दिवसांपूर्वीच बेबी बंपसह फोटो शेअर करत लवकरच आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. १६ मार्चला प्राजक्ताच्या घरी चिमुकलीचं आगमन झालेलं आहे. तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.

Gulabi Sadi
‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग झाली आई ( Gulabi Sadi Fame Actress )

प्राजक्ताच्या नवऱ्याचं नाव रोहित बोराडे असं आहे. व्यवसायाने तो फिटनेस ट्रेनर म्हणून ओळखला जातो. रोहित आणि प्राजक्ता यांनी “वेलकम टू द वर्ल्ड बेबी गर्ल- १६ मार्च २०२५” अशी पोस्ट शेअर करत, त्यांना कन्यारत्न झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader