काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करणारा संगीत दिग्दर्शक चर्चेत होता. या चर्चा त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या पोस्टमध्ये त्याने एका हिंदी अभिनेत्रीचा उल्लेख करत तिच्यामुळे त्रस्त असल्याचे म्हटले होते. आता अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.
तुषारने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री गुलकी जोशीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, ‘माझ्या मागच्या एका मुलाखतीमध्ये मी CINTAAचे कार्ड दाखवले होते. या कार्डवर फोन नंबर दाखवण्यात आला आहे. हा फोन नंबर माझा नसून तुषार देओल यांचा आहे. तुमचे सर्वांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आणि तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा असतो. पण अनेकांनी माझा नंबर समजून तुषार यांना फोन केला आहे. दिवसभरात त्यांना १०० ते २०० फोन जात आहेत. या सर्वामुळे ते त्रस्त झाले आहेत. मी विनंती करते तो फोन नंबर डिलिट करा. मी त्यांना ओळखत पण नाही’ असे बोलताना दिसत आहे.
KBC 13 : अय्यर आणि बाघाने अमिताभ यांना विचारलेले प्रश्न ऐकून तुम्हाला होईल हसू अनावार
काय होती तुषारची पोस्ट?
तुषारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने, ‘नमस्कार, मी तुषार देवल गेले काही दिवस मला खूप फोन येत आहेत.. त्यामुळे मी प्रचंड त्रस्त झालो आहे. या सगळ्याचं कारण आहे एका हिंदी मालिकेतील अभिनेत्री (ख्याती जोशी) उर्फ गुलरी जोशी. तिने तिच्या एका यूट्यूब इंटरव्ह्यूमध्ये तिचं CINTAAचं कार्ड दाखवलं. ज्यामध्ये माझा मोबाईल नंबर दाखवला गेला’ असे म्हटले होते.
पुढे तो म्हणाला होता की, ‘मी गुलकी जोशी असल्याचे समजून मला दिवसाला जवळपास १०० च्या वर कॉल येत आहेत. ही सर्व माहिती त्या अभिनेत्रीपर्यंत माझ्या एका मित्राच्या माध्यमातून पोहोचवली. त्यावर तिने त्या यूट्यूब चॅनेल मधील व्हिडीओतील माझा नंबर ब्लर केला. पण तोपर्यंत हा व्हिडीओ ६ हजार लोकांनी पाहिला होता. त्यामुळे मला अजूनही कॉल येत आहेत. बरं या सगळ्या प्रकरणानंतर मॅडमने मला सॉरी म्हणालायला तरी कॉल करायला पाहिजे होता. तो अद्याप आलेला नाही… तरी या प्रकरणातून मार्ग कसा काढचा येईल गुलकी जोशी?’