२०१९ या वर्षातला सर्वाधिक चर्चेला आणि लोकप्रिय ठरलेला गली बॉय हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केली. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेला हा चित्रपट केवळ देशातच नाही,तर परदेशातही लोकप्रिय ठरत असून या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे.

झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सादर करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये रणवीर मुख्य भूमिकेत झळकला असून त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर चांगलीच पडली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आठव्याच दिवशी १०० कोटीची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘गली बॉय’च्या आठव्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी ट्विटरवर शेअर केली आहे.

तरण आदर्श यांच्या आकडेवारीनुसार, ‘गली बॉय’ने पहिल्याच दिवशी १९.४० कोटी, दुसऱ्या दिवशी १३.१० कोटी, तिसऱ्या दिवशी १८.६५ कोटी कमाआ केली. तर पाचव्या दिवशी ८.६५ कोटी , सहाव्या दिवशी ८.०५ कोटी, तर सातव्या दिवशी ६.०५ कोटी इतकी कमाई झाली. चित्रपट प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी ५.१० कोटी रूपयांचा गल्ला जमवत ‘गली बॉय’ने १००.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे

दरम्यान, हे नवीन वर्ष गली बॉय अर्थात रणवीरसाठी लकी ठरलं असून शंभर कोटींचा टप्पा पार करणारा हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. विशेष म्हणजे झोया अख्तरच्या करियरमधीलही हा सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Story img Loader