आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यामध्ये फार चांगली मैत्री आहे. दोघांनी आतापर्यंत एकत्र सिनेमात काम केले नसले तरी दोघांना जाहिरातींमध्ये एकत्र पाहण्यात आलेय. जाहिरातींमधे त्यांची केमिस्ट्री दिसून आलीये. लवकरच हे दोघं झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ सिनेमात दिसणार आहेत. हे दोघं नुकतेच फॅशन डिझाइन काऊंन्सिल ऑफ इंडियाच्या ‘इंडिया कोचर वीक २०१७’ मध्ये मजा- मस्ती करताना दिसले. दोघांनीही त्यांचे मस्तीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणवीर त्याच्या नेहमीच्या मस्तीखोर अंदाजात दिसतोय तर आलिया आणि डिझायनर मनिष मल्होत्रा त्याला त्रासलेले दिसतात.
‘टायगर जिंदा है’च्या रॅपअप पार्टीमध्ये दिसले सलमान आणि कतरिना
आलिया आणि रणवीर, मनिष मल्होत्रासाठी शॉ स्टॉपर झाले होते. रणवीरकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये मनिष तोंडावर हात घेऊन बसला आहे, तर त्याच्या बाजूला रणवीर उभा आहे. ‘मी कोणाला घेऊन आलोय असाच विचार मनिष करत असेल,’ असे अनोखे कॅप्शन त्याने या फोटोला दिले. तर आलिया भट्टने शेअर केलेल्या फोटोमध्येही रणवीर सोफ्यावर चढून वेडे वाकडे हावभाव करत आहे तर आलिया त्याच सोफ्यावर शांत बसली आहे. ‘विक्रम आणि वेताळ’ असे कॅप्शन रणवीरने या फोटोला दिले. रणवीर- आलियाच्या या स्पेशल बॉण्डिंगमुळे त्यांना लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत. सध्या रणवीर, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.
वाणी कपूरचं हॉट फोटोशूट पाहिलेत का?
‘गली बॉय’ सिनेमाची कथा एका स्ट्रीट रॅपरची आहे. यात रणवीर रॅपरची व्यक्तिरेखा साकारणार आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सल एण्टरटेनमेन्ट आणि झोयाच्या टायगर बेबी या दोन बॅनर अंतर्गत या सिनेमाची निर्मिती होणार आहे. नोव्हेंबरपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल. ‘गली बॉय’ सिनेमाच्या कास्टिंगवरूनही अनेक चर्चा रंगल्या होत्या. रणवीरची जागा वरुण धवनने घेतली असेही म्हटले जात होते. पण कालांतराने या सिनेमात आलिया आणि रणवीरचं काम करणार असल्याचे स्पष्ट झाले.